गाय विकत घेतांना काय गोष्टी पाहून घ्यावी संपूर्ण माहिती..

मित्रांनो, शेती आणि त्या शेतीसोबत जोडधंदा करणं गरजेच आहे हे आता सगळ्या शेतकऱ्यांना हळूहळू पटू लागलय. जमिन लहान असो वा मोठी शेतीला पुरक असा एक जोडधंदा असला की शेती वर जास्त अवलंबून न राहता तुमच्या घरात पैशांचा ओघ सुरु राहतो. कारण आपल्याकडची शेती पावसावर अवलंबून आहे हे तुम्हाला माहीतीच आहे. ह्याच कारणामूळे गावतली बरीच मंडळी नोकरीच्या शोधात तालूक्याला किंवा शहराला जातात. काहींनी तर जमिनी विकून शहराच्या खुराड्यात राहून नोकरी केली. पण आतादिवस असे आहेत की नोकरीचा ही भरोसा नाही. आज आहे ती उद्या नाही. शेतीवर अवलंबून नको म्हणून नोकरी केली तर नोकरीची ही गॅरंटी आजकाल नाही. मग आता करायचं काय?
त्यात बरेच जण शिकतात. तालुका शहराला जातात. नोकरी करतात. त्यांना शेती आणि इतर कामं येत असतात पण शिकल्यामुळे एक नको तो गर्व येतो की आता आपण इतके शिकलो आणि नोकरी नाही मिळत म्हणून शेती किंवा घरचा पारंपरिक व्यवसाय कसा करायचा? लोकं काय म्हणतील.
पण ह्या सगळ्याला छेदत लोकं काय म्हणतील ह्याचा विचार न करता काही लोकं आपल्या आवडीच्या कामाला हात घालतात आणि यशस्वी होतात. त्यात आताची महागाई अशी की नुसती शेतीही पुरेशी नाही आणि नुसती नोकरीही पुरेशी नाही. ह्यातून काहीजण आपल्या पध्दतीने मार्ग काढतात.
आज आम्ही अश्याच एका माणसाला भेटलो ज्यांनी मळकी वाट सोडून स्वतःच्या आवडीने दुध व्यवसायात उतरुन आणि यशस्वी करून दाखवला. ते आहेत विभीषण लेंडवे. मंगलवेढा तालुक्यातल्या आंधळगावात ते राहतात.

गाय विकत घेतांना काय गोष्टी पाहून घ्यावी संपूर्ण माहिती..


विशेष म्हणजे ते एक शिक्षक आहेत. नोकरीही चांगलीच आहे. पण आवड आणि निकड त्यांना स्वस्त बसू देत नव्हती. त्यांना जनावरं पाळायची आवड आहे. मग काय? आवड आहे तर सवड आहे. त्यांनी २०१८ साली एका गाय पाळण्यापासून सुरुवात केली. लगेच एकाच्या पाच गाई झाल्या. संगोपन करतांना आपल्या डॉक्टर मित्रांचे मार्गदर्शन घेत त्यांनी पंजाब आणि बंगळूर अशा ठिकाणांहून गाई विकत आणल्या आणि २ वर्षात त्यांचा पाच गाईंचा गोठा २० गाईंचा झाला.
त्यांचा हा गोठा मुक्त गोठा आहे, त्यात सगळ्या एच. एफ. जातीच्या गाई आहेत. मुक्तं गोठा निवडण्याचा निर्णय त्यांनी घेतला कारण त्याचा गाईंच्या आरोग्यावर चांगला परीणाम होतो. गाई चालत फिरत असतात, त्यांच्या वरचा तान कमी होतो. फिरल्यामुळे त्यांच्या पोटाचा व्यायाम होतो. त्यामुळे चाऱ्याचे पचन होते आणि अर्थातच दुध उत्पादन चांगलं होतं.
त्यांनी सगळ्या गोठ्यात आधुनिक पध्दत वापरली आहे. मिल्किंग मशीन ते चारा कापण्याची मशीन. तसेच चाऱ्यासाठी ते ३६५ दिवस पुरेल इतका मुरघास स्वतः तयार करतात.
त्यांनी मुक्तं गोठा पध्दत का निवडली.
व्यवसाय सुरु करताना त्यांना कोणत्या अडचणी आल्या?
जनावरांच्या आरोग्याची काळजी ते कशी घेतात.
ओला चारा, सुका चारा, ते कोणता देतात.
मुरघास ते कसा तयार करतात?
त्यांच्या कडच्या गायांच्या गाभण राहण्याला ते काय उपाय करतात.
गाय विकत घेतांना काय गोष्टी पाहून घ्यावी

1 thought on “गाय विकत घेतांना काय गोष्टी पाहून घ्यावी संपूर्ण माहिती..”

  1. Can you be more specific about the content of your article? After reading it, I still have some doubts. Hope you can help me.

Leave a Comment