आमच्या शेतकरी मित्रांनो, नोकरीच्या संधी कमी होत असतांना, शहराकडचे रोजगार कमी होत असताना, अर्थव्यवस्था अवघड वळणावर असतांना, ह्या काळात आम्ही अश्या व्यावसायिक मित्रांना भेटतो ज्यांनी नोकरीची मळकी वाट सोडून, शेताकडे आणि शेतीच्या जोडधंद्याकडे लक्ष्य केंद्रित केले आणि स्वतःच्या मेहेनतीवर व्यावसाय करण्याचे धाडस केले. आणि ग्रेट महाराष्ट्र ने नेहमीच ह्यांची यशोगाथा तुमच्यापर्यंत पोहचवून नव्याने व्यवसाय करु इच्छिणाऱ्या तरुणांच्या मनात उत्साह जागवण्याचं काम केलं आहे.
ह्या दिवसात दुग्धव्यवसायाकडे तरुणांचा ओघ वाढलेला दिसतोय. स्वतःचं शेत असलेले तरुण तर शेतीचा वापर दुग्धव्यवसायासाठी तर दुग्धव्यवसायातून मिळणारा नफा शेती साठी वापरत आता दोन्हीमधे प्रगती साधता आहेत. आता जे दुध व्यवसाय करु इच्छित आहेत त्यांच्या समोर गाई ने सुरुवात करावी की म्हशी ने? गाय घेतली तर कुठल्या जातीची घेऊ? म्हैस घ्यायचं म्हटलं तर कुठली म्हैस फायद्याची ठरते? असे प्रश्न त्यांना पडतात. असे प्रश्न पडणं सहाजिकही आहे. कारण एच एफ गाय आणि जर्सी गाय ह्या विदेशी गाई, गीर,साहिवाल, राठी, थारपारकर, खिल्लार ह्या देशी गाई इतके पर्याय गाई निवडताना समोर असतात, तर मुऱ्हा, जाफराबादी, पंढरपुरी इत्यादी पर्याय म्हैस निवडताना समोर असतात. ह्यातला कुठला पर्याय फायद्याचा? तो कुठून घ्यावा? योग्य किंमत आणि माहीती आपल्याला कोण देईल? हे प्रश्न अर्थातच पडणार.
पण आम्ही नेहमीच नव्याने व्यवसाय सुरु करणाऱ्यांची ओळख त्यांना ह्या व्यवसायासाठी योग्य पर्याय निवडून देणाऱ्यांशी आणि त्यांनी निवडलेले जनावरं गोठ्यापर्यंत पोच करणाऱ्यांशी करुन देत आलो आहे.
आज आपण अश्याच एका फार्म विषयी जाणून घेणार आहोत जी एच एफ, साहीवाल, गाय आणि मुऱ्हा म्हैस आणि इतर सर्व जातीच्या गाईंच्या विक्रीचा व्यवसाय करते.
ह्या फार्मचं नाव आहे क्वालिटी डेअरी फार्म. हरीयाणा राज्यात कर्नाल येथे ही फार्म आहे.
नावाप्रमाणेच इथे असणाऱ्या एच एफ आणि साहिवाल गाई आणि मुऱ्हा म्हशी क्वालिटी असणारे आहेत. ही डेअरी फार्म १९८० पासून कार्यरत आहे. त्यांनी आजवर भारतभर एच एफ गाय, साहिवाल गाय, मुऱ्हा म्हशी ह्यांची विक्री केली आहे.
एच एफ गाय म्हणजे हॉल्सटिन फ्रिसियन ही गाय जगात सर्वाधिक दुध उत्पादक क्षमता असणारी गाय म्हणून प्रसिद्ध आहे. तिचे मुळ होलंड, या युरोपीय देशातले आहे. ही रंगाने संपूर्ण पांढरी किंवा काळेपांढरे चट्टे असणारी असते. क्वचित काही गायांचा रंग लाल पांढरा देखील असतो. पायाखालील भाग आणि शेपटीचा गोंडा पांढरा असतो. हिचा दुध देण्याचा कालावधी ३०० दिवसांचा असतो. जास्तीत जास्त ६००० लिटर दुध देण्याची क्षमता असलेली ही गाय आहे आणि हिचे सरासरी आयुष्य १२ वर्षाचे असते. क्वालिटी डेअरी फार्म कडे १८ ते ३० लिटर दुध क्षमता असणाऱ्या एच एफ गाई मिळतील. हरीयाणातून मिळणाऱ्या एच एफ गाई चांगल्या व सुदृढ असतात. त्यामुळे ह्याच ठिकाणाहून त्या घेणं व्यावसायिक पसंत करतात.

साहिवाल गाय ही भारतीय वंशाची गाय असून ती देखणी असते आणि मालकाची भक्त म्हणून ती प्रसिद्ध असते. हिचे तोंड आणि शिंग लहान असतात. असं म्हणतात की ही गाय स्वभावाने तापट असते. पण ते नव्या माणसासाठी. तिला सवयीची झालेली माणसे तिची लाडकी असतात. ही गाय भारतीय वंशाच्या गायांच्या दुधउत्पादनात अग्रेसर समजली जाते. एका वेळेला ही १४ ते १६ लिटर दुध देते. पहील्या किंवा दुसऱ्या वेतातली गाय तुम्हाला हवी असल्यास अधिक चौकशीसाठी स्क्रिनवर दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधा. ह्याशिवाय १६ ते १८ लिटर आणि १८ ते २० लिटर दुध देणाऱ्या गाई देखील तुम्हाला क्वालिटी डेअरी फार्म मधे मिळतील. ह्यांची किंमत ६० हजारांपासून पुढे सुरु होते. तुम्हालाही ही गाय हवी असल्यास स्क्रिन दिसणाऱ्या नंबरवर संपर्क करा आणि आपली ऑर्डर द्या.
मुऱ्हा म्हैस ही म्हशीच्या दुधाच्या उत्पादनात सर्वाधिक पसंतीस उतरलेली म्हैस आहे. हिचा उगम उत्तर भारतातला आहे. ह्या म्हशींचा शरीरबांधा मोठा, भारदस्त व कणखर असतो. एका वेतातील दुधाचे प्रमाण ३००० ते ३५०० लिटर असते. १५ ते १८ लिटर दुध देणाऱ्या, पहील्या किंवा दुसऱ्या वेताच्या मुऱ्हा म्हशी तुम्हाला क्वालिटी डेअरी फार्म मधे मिळेल. महाराष्ट्रातील बरेच शेतकरी म्हशीच्या दुधाच्या उत्पादनासाठी मुऱ्हा म्हशीचाच उपयोग करतात. ह्यांचा उगम उत्तर भारतात असल्याने त्याच ठिकाणाहून ती विकत घेणे व्यावसायिक पसंत करतात. पण तिकडून ती विकत घेतांना काळजीपुर्वक आणि विश्वासू विक्रेत्यांकडूनच ती विकत घेणे फायद्याचे ठरते. क्वालीटी डेअरी फार्म ही अशीच विश्वासू फार्म आहे. गाई म्हशींची संपूर्ण तपासणी करुन, ग्राहकाचे पुर्ण समाधान करुनच त्यांना ती विकली जाते.
तुम्ही आपली ऑर्डर व्हॉट्स ॲप वर देखील देउ शकता. गाई किंवा म्हशींचे गाडीमधे लोडींग करते वेळी तुम्हाला ५० टक्के रक्कम द्यावी लागेल आणि उरलेली रक्कम गाई वा म्हशी गोठ्यावर पोचल्यावर तुम्ही देउ शकता. कारण बरेच विक्रेते संपूर्ण रक्कम आधीच घेऊन मग जनावरे गोठ्यावर पाठवतात आणि गोठ्यावर पोचलेले जनावर अपेक्षेप्रमाणे नसेल तर त्याची जबाबदारी ते घेत नाही आणि पैसे पुर्ण मिळालेले असल्याने ते निर्धास्त राहतात. क्वालिटी डेअरी फार्म तुमचे समाधान झाल्याशिवाय पुर्ण रक्कम घेत नाही.
ह्याशिवाय गाई म्हशी पाठवतांना प्रवासात सोबत त्यांची काळजी घेणारा डॉक्टर व प्रवासात लागणारा चारा सोबत पाठवला जातो. गाई व म्हशीच्या ऑर्डर द्यायच्या आधी तुम्हाला त्यांची दुग्धोत्पादन क्षमता तपासायची असेल तर तुम्ही त्यांचं लाईव्ह मिल्कींगही पाहू शकता. किंवा थेट क्वालिटी डेअरी फार्म च्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन ही तुम्ही तपासणी करु शकता.
मित्रांनो ग्रेट महाराष्ट्र चॅनल चा उद्देश तुम्हाला गाई म्हशींच्या विश्वासु विक्रेत्यांची माहिती करुन देणे हा आहे. ह्याच उद्देशाने आजच्या ह्या व्हिडीओ मधे आम्ही क्वालिटी डेअरी फार्म बद्दल माहीती पुरवण्याचे ठरवले. पण तुम्ही संपूर्ण खात्री करुन, तपासणी करुन, समाधान झाल्यावरच तुमचा निर्णय घ्यावा ही आमच्या चॅनलच्या टीमकडून विनंती आहे.
कुठल्याही गैरप्रकाराला ग्रेट महाराष्ट्र चॅनल जबाबदार राहणार नाही.
तर ही होती , हरीयाणा येथील कर्नाल मधील क्वालिटी डेअरी फार्मबद्दल संपूर्ण माहीती.