मुरघास साठवण्यासाठी पिशवी कोणती घ्यावी…

मित्रांनो, गोठा व्यवस्थापन हा विषय आला की त्यात बऱ्याच गोष्टी येतात. गोठ्याची जागा, जनावरांचे प्रकार, दुध उत्पादन क्षमता, जनावरांचे आरोग्य, पाण्याचं चाऱ्याचं व्यवस्थापन असं बरच त्या विषयाशी संबंधीत आहे.

त्यात चाऱ्याचा जो विषय आहे तो तितकाच महत्वाचा आहे. जनावरांना वर्षभर पौष्टिक चारा पुरवणं हे खरंतर अवघड काम असतं. कधी पाऊस पुरेसा नसल्याने दुष्काळी परीस्थिती येते तर कधी अती पावसाने असलेल्या चाऱ्याचे नुकसान होते. त्यामुळे सतत चारा व्यवस्थित ठेवणे अवघड होते…
ह्यावर मुरघास हा चाऱ्याचा उपाय आहे. तो बाजारात विकत ही मिळतो आणि गोठ्यावरही तो बणवला जाऊ शकतो. ग्रेट महाराष्ट्रने ह्या आधीच मुरघास कसा तयार करावा ह्याची माहीती देणारा व्हिडीओ बणवला आहे तो तुम्ही पाहू शकता. पण थोडक्यात सांगायचं तर वेगवेगळ्या चाऱ्याचे म्हणजे मका, उस, गहू इत्यादी चाऱ्याला विशेष आंबवणात मुरवून हा चारा केला जातो जो वर्षभर पौष्टिक असतो. त्यामुळे दुष्काळाच्या परीस्थितीही चारा उपलब्ध होतो.
पण मुरघास वर्षभर साठवून ठेवायचा तर त्याची व्यवस्थाही तशीच टिकाऊ असायला हवी. मुरघास तयार होताना त्यात पाणी न जाऊ देणं, वर्षभर हवाबंद ठेवणं हे मुरघास टिकवून ठेवण्यासाठी महत्वाचं असतं. वापरलेल्या पिशव्या आणि नायलॉनच्या पिशव्या मधेच चिरल्या जाऊन चाऱ्याची नासाडी होते.

मुरघास साठवण्यासाठी पिशवी कोणती घ्यावी...


त्यासाठी मुरघास साठवण्यासाठी पिशवी हवाबंद आणि टिकाऊ असायला हवी..
अवाना कपिलाची मुरघास बॅग ही अशीच सुरक्षित आणि टिकाऊ आहे.
नव्या कापडाने तयार केल्यामुळे ही दर्जेदार बॅग मधे मुरघास योग्य प्ध्दतीने मुरतो आणि त्याचा दर्जा सुधारतो. पौष्टिक मुरघास खाल्ल्याने जनावरांच्या दुध उत्पादन क्षमतेत १० ते १२ टक्क्यांनी वाढ होत असते.
इतर साधारण बॅगमधे जास्त चारा भरला जाऊ शकत नाही कारण त्यांच लायनर पक्क अस असतं. पण अवाना कपिला बॅगचं लायनर तानला जाऊ शकतो आणि म्हणून ह्यात जास्त चारा भरला जाऊ शकतो.
एक वर्ष वापरल्या नंतर दुसऱ्या वर्षात परत बॅग वापरतांना इतर बॅग खराब होतात पण अवाना कपिला बॅग ही खराब न होता टिकून राहते कारण हिला बणवतांना फोडर टेक्स तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलेला आहे. उन पावसात टिकाव धरण्यासाठी हिला बणवतांना युव्ही पॉलिमरचा वापर केल्याने वापरतांना हिचा भुगा होत नाही. तसेच दोन टाक्यांनी तयार केल्यामुळे ही मजबूत देखील राहते.
हवेचा शिरकाव होऊ नये म्हणून लायनर आणि डफल टॉप हवेला बाहेरच रोखतात आणि चारा उत्तम रित्या आंबवला जातो.
तसेच हिला देण्यात आलेले बांध म्हणजे लुप्स मजबूत असल्याने चारा टाकून बॅग लटकवूनही ठेवता येते किंवा दाब देवून चारा भरला तरी लुप्स मजबूत राहतात.
काळ्या आणि पांढऱ्या रंगात , आणि ५० किलो, ५०० किलो, १००० किलो ह्या क्षमता असलेल्या बॅग उपलब्ध आहेत. .
तुम्हाला ह्या बॅग्स ऑर्डर करायच्या असतील तर आत्ताच स्क्रिन वर दिसणाऱ्या नंबर वर संपर्क साधा.
ह्या शिवाय पॅकिंग बॅग , तारपोलिन, बायोफ्लॉपिंग टाकी, पोर्टेबल टाकी ही उपलब्ध आहे.

3 thoughts on “मुरघास साठवण्यासाठी पिशवी कोणती घ्यावी…”

Leave a Comment