शेतकऱ्याने चक्क घरावर डाळींबाची मोठी प्रतीकृती बनवून घेतली…

मित्रांनो एखाद्या माणसाने कष्टाने, जिद्दीने, मेहनतीने जर शुन्यातून जग उभं केलं असेल तर तर तो माणूस आपल्या ह्या कष्टाचं चिज झाल्याबद्दल कोणालातरी आपल्या ह्या यशाचं श्रेयं देतोच. जसं की ट्रॅक, घर, बंगले किंवा अगदीच रीक्षा वर सुध्हा ती ती माणसं आई ची कृपा, स्वामींची कृपा, बाबांचा आशीर्वाद इतकच काय काहींनी तर बायकोचा आशीर्वाद अश्याही पाट्या रंगवून लावलेल्या आहेत. काहींनी आई वडीलांचे नाव, मानत असलेल्या देवाचे किंवा स्वामीचे नाव, मुलगा किंवा मुलगी ह्यांचा पायगून शुभ ठरला आहे असे वाटून त्यांचे नाव आपल्या बंगल्याला, व्यवसायाला दिले आहेत. पण सांगोल्यातील एक शेतकऱ्याने आपल्या भरभराटीचं सर्व श्रेयं एका फळाला दिले आहे. ते फळ म्हणजे डाळींबं. त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ह्या शेतकऱ्याने चक्क घरावर डाळींबाची मोठी प्रतीकृती बनवून घेतली आहे.
हे शेतकरी आहेत शिवाजी अंबादास कोळेकर. त्यांची शेती सोलापूर जिल्ह्याच्या सांगोला तालूक्यातील जवळा गावात आहे.
आधी सांगितल्या प्रमाणे त्यांनी खरच शुन्यातून विश्व उभं केलय आणि हे विश्व उभं करण्यार डाळिंब पिकाचा सिंहाचा वाटा आहे. शिवाजी कोळेकर हे आधी मोल मजुरी करत होते. पण मनात मोठ्ठं स्वप्न होतं जे पुर्ण करायची तिव्र इच्छा त्यांना होती आणि त्यासाठी ते जमेल ती मेहनत करायला तयार होते.
हळूहळू पैसे जमवत त्यांनी दोन एकर शेती घेतली. ती जमीन काळ्या मातीची होती. शेत घेतांनाच त्यावर कसली शेती करायची ह्याचा विचार शिवाजी कोळसेकरांनी आधीच केलेला होता. त्यांना फळं लागवडीची आवड होती. ह्या शेतीसाठी त्यांनी डाळिंबाची निवड केली आणि ह्या एका निर्णयाने त्यांचं आयुष्य बदलायला मदत केली. डाळिंबासाठी जमीन काळी लागते ती त्यांच्याकडे होती पण सोबतच पाण्याचा व्यवस्थित निचराही व्हायला लागतो. त्यासाठी त्यांनी सपाट जमीन असमांतर करुन एका बाजूने पाण्याचा निचरा होईल अशी व्यवस्था केली आणि डाळिंब लागवडीला सुरुवात केली.
डाळिंब लागवड कशी करतात हे त्यांनी ह्या व्हिडिओत थोडक्यात सांगितलेच आहे पण सविस्तर माहितीसाठी ग्रेट महाराष्ट्र ने केलेल्या डाळिंब लागवडीचा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता.

शेतकऱ्याने चक्क घरावर डाळींबाची मोठी प्रतीकृती बनवून घेतली...

तर डाळिंब लागवड केल्यावर हळूहळू त्यातले उत्पन्न त्यांनी वाढवत नेले. दोन एकरची शेती आता दहा एकराची झाली. डाळिंब शेती अजूनही त्यांच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत आहे. ते आता भगवा ह्या जातीचे डाळिंब पिक घेताहेत. ह्याच शेतीवर त्यांनी स्वतःच घर उभारलं. दोन्ही मुलांची शाळा कॉलेजं केली. एक मुलगा फार्मसी करतोय तर दुसरा कॅमिस्ट्री मधूब बि.एस. सी करुन आता एम. एस. सीला प्रवेश करतोय.

हे सगळं डाळिंबामुळे श्यक्य झाल्या मुळे त्यांनी डाळिंबाची एक मोठी प्रतिकृती घरावर करुन घेतली आहे. जवळा गावतल्या लोकांसाठी हे घर आकर्षण बिंदू बनले आहेच सोबतच एक प्रेरणाही शिवाजी कोळसेकर ह्यांच्या ह्या यशोगाथेतून सर्वांसाठी मिळतेय.

त्यांनी कश्याप्रकारे डाळिंब शेती भरभराटीला आणली?
डाळिंब शेती करताना काय काळजी घेतली?
डाळिंब शेतीतून त्यांना महीन्याला आणि वर्षाला किती उत्पन्न मिळते?
डाळिंब शेती का करावी ह्या बद्दल त्यांचा शेतकऱ्यांना काय सल्ला आहे?
कमी पाणी असलेल्या भागात डाळिंब लागवड कशी करावी?
आधुनिक शेती उपकरणांचा त्यांना काय फायदा झाला?

Leave a Comment