सेंद्रीय खतांचं महत्व काय आहे ?

मित्रांनो, आपण पाहतो की गावात शिकलेली मुलं मुली शहरात जातात, तिकडेच नोकरी करतात, शहरात शिकलेलं मुलं आणखी मोठ्या शहरात नोकरीला जातात आणि तिकडेच स्थायिक होतात तर काही मोठ्या शहरातली मुलं बाहेर देशात जाऊन तिकडेच स्थायिक होतात. पण फार क्वचितच अशी उदाहरणं पहायला मिळतात की मुलं मुली शहरात शिकले किंवा मोठ्या शहरात शिकले पण ते आपलं भविष्य घडवण्यासाठी पुन्हा गावाकडे फिरकतात. “स्वदेस” मधला मोहन जसा अमेरीकेतला “नासा” ची नोकरी सोडून आपल्या गावात रमतो तसं रमणारे तरुण सध्या कमीच आहेत.
पण ग्रेट महाराष्ट्र अश्या दोन भावांना भेटलय ज्यांनी सुशिक्षित घरात जन्माला येउन आणि पुण्यासारख्या मोठ्या शहरात शिक्षण घेऊनही आपलं उज्वल भविष्य घडवण्यासाठी गावखेड्याची वाट धरली.शुभम शांताराम सावंत आणि ऋषीकेश शांताराम सावंत ही ती दोन भावंडं. त्यांच्या वडीलांच्या म्हणजे शांताराम सावंतांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी पहीली गोशाळा २०१७ मधे सुरु केली. तेव्हा खिल्लार जातीच्या दोन देशी वंशांच्या गाईंपासून त्यांनी सुरुवात केली आणि बघता बघता आता ही गोशाळा तब्ब ४०० देशी वंशांच्या गोधनाने समृद्ध झालेली आहे. पुण्याच्या मावळ तालुक्यातल्या आढळ बुद्रूक ह्या गावात त्यांनी हे श्यक्य करुन दाखवलय. हा परीसर पाण्याच्या बाबतीत कम नशीबी आहे. इथे पाऊस चांगला नाही. पिण्याच्या पाण्यासाठीही पंधरा दिवस थांबावं लागतं इथे. इथे कोणतीही दळणवळाची सोय नव्हती, की विजेची सोय नव्हती. अश्या ठिकाणी काहीच होणं श्यक्य नाही असं त्यांना बऱ्याच जणांनी सांगितलं. पण एकदा जिद्द मनात असली की वाळवंटातही पाण्याचा झरा सापडतो. अगदी तसच सावंत बंधुंनी ह्या कामाला जिद्दीने सुरुवात केली. स्वखर्चाने ज्या सोयी नव्हत्या त्या उपलब्ध करुन घेतल्या. आणि ह्या नापिक, खडकाळ, माळरान जमिनीवर त्यांनी घाम गाळला
आणि आज त्यांच्याकडे, खिल्लार, गीर, साहीवाल, कांकरेज, राठी, थारपारकर, ह्या देशी जातींच्या तब्बल ४०० गाई त्यांच्या गोशाळेत आहेत.

सेंद्रीय खतांचं महत्व काय आहे ?


त्यांच्या गोशाळेच नाव आहे बाळकृष्ण गोशाळा.
ह्या गोशाळेचं महत्व असं की इथे सध्या ४०० पैकी १२० जनावरं भाकड आहेत आणि त्यातले काही म्हातारी जनावरं आहेत. ही जनावरं इतर लोकं खाटकाला देतात किंवा मोकाट सोडून देतात कारण त्यांचा दुधासाठी उपयोग नसतो, पण ह्या गोशाळेचं उद्दीष्ट असं आहे की जनावरं एकदा इथे आलं की इथे त्याची मरेपर्यंत काळजी घेतली जाणार. सध्या काही जनावरं केवळ शेणखतासाठीच उपयोगी आहेत तर काही भाकड काळात आहेत तरीही त्यांच्या देखभाली साठी इथे १२ कामगार राबत असतात. बाळकृष्ण गोशाळेत एकुण १७ कामगार आहेत.
सावंत बंधूंना एका देशी गोशाळेत गेल्यावर आपणही मुक्या जनावरांसाठी त्यातल्या त्यात देशी जनावरांसाठी काहीतरी करावं असं वाटलं. पुर्वी तब्बल ७० वेग्वेगळे देशी गायांचे वंश आपल्याकडे होते, आता केवळ ३० च शिल्लक राहीले आहेत. त्यांच संगोपन करुन नव्या पिढीत एक आदर्श त्यांनी निर्माण करायचं ठरवलं.
खडकाळ नापीक जमीन असल्याने ते चाऱ्यासाठी मुरघास आणि हायड्रोपोनीक चारा ह्यावर पशुंच पोषण करतात.
त्यांच्या १४० गाई ह्या दुग्धोत्पादनासाठी आहेत, ज्यातून महीन्याला पाच लाखांपर्यंत उत्पन्न त्यांना मिळतं.
ह्या व्यतिरिक्त पंचगव्याचं उत्पादन देखील ते इथे करतात. गोमुत्रापासून अर्क, तुप , धुपकांडी, कॉस्मेटिक्स अशी वेगवेगळी उत्पादने ही ते इथे बणवतात.
विशेष म्हणजे त्यांनी दहा दहा दिवसात शेणखत बणवण्याचा एक प्रकल्प इथे विकसित केलाय. ह्या खताला प्रचंड मागणी इथल्या शेतकऱ्यांकडून आहे.
दोन गाईंचा गोठा, ते ही खडकाळ, नापिक जमीनीवर सुरु करुन चारशे देशी वंशांच्या गाईंची गोशाळा. शेणखताचा आणि पंचगव्याचा प्रकल्प. हे सगळं ह्या तरुण मुलांनी वयाच्या तिशीच्या आत आणि तीन वर्षात साध्य केलं.
कसं केलं त्यांनी हे श्यक्य?
खडकाळ जमिनीची आणि त्यांच्या खेड्याची निवड त्यांनी का केली?
ह्या जमिनीत जनावरांसाठी पाण्याची व्यवस्था त्या जनावरांच्याच कृपेने कशी झाली?
देशी वंशाच्या गायांना त्यांनी का निवडलं?
ह्या सगळ्या गोठ्याचं नियोजन ते कसं करतात?
शहरातून खेड्याकडं यावं असं ह्यांना का वाटलं?
पंचगव्याचं महत्व काय आहे?.

Leave a Comment