मित्रांनो, आता उन्हाळा आला आहे. सुर्य आग ओकतोय. पण हेच दिवस असतात फळांच्या राजाचे. म्हणजे अंब्याचे. आंब्याचं नाव घेताच तोंडाला पाणी येणारे अनेक लोकं आहेत. पण हा आंबा पिकवणं, त्यातल्या त्यात उत्कृष्ट आंबा पिकवणं हे अवघड काम.
आमराई फुलवणं म्हणजे वेळ घेणारं आणि कष्टाचं काम.
आज आम्ही अश्याच फुललेल्या आमराईत आलो आहोत. जिचं नाव आहे गुलाबतारा आमराई. पुण्यातल्या शेळवी या ठिकाणी बापूसाहेब लोखंडे आणि त्यांच्या पत्नी माधवी लोखंडे ह्यांची ही फार्म आहे.
खरं तर बापुसाहेब हे कायनॅटीक इंजिनयरींग शिकलेले. माझ्या आयुष्याची ४० वर्ष नटबोल्ट शी खेळण्यात गेली. अश्या वेळेला कुठलीही शेती करणं माझ्या डोक्यात नव्हतं असं ते सांगतात. पण त्यांच्या पत्नीची म्हणजेच माधवीताईंची शेती करण्याची इच्छा होती. त्यांच्या सासूबाईंची ही तिच इच्छा होती. त्यांनी आपल्या सुनेला ही जमिन भेट म्हणून दिली. आपल्या सासूबाईंची इच्छा पुर्ण करण्यासाठी त्यांनी बापुसाहेबांना ह्या जमिनीवर शेती करण्यासाठी आग्रह धरला. बापुसाहेबांनीही पत्नीचा हा हट्ट पुरवला. आमराई फुलवण्याचा निर्णय घेतला.
इथे एक विनंती, तुमची ही आमराई असेल तर भारत ॲग्री ॲप वर त्याची नोंद करा, तुमच्या आमराईच्या माहीतीवर आधारीत तुम्हाला विशेष मार्गदर्शन जाणकारांतर्फे भारत ॲग्री ॲपवर मिळेल.

तर, बापुसाहेबांनी आंबा हेच फळ का निवडलं ह्या वर ते सांगतात की आंबा हे तुळशी सारखच पवित्र झाड मानलं जातं. शिवाय आंबा हे बाराही महीने हिरवंच असणारं झाड आहे… आणि मुख्य म्हणजे हे पिक कमीतकमी २५ ते ५० वर्ष टिकतं. वादळाचा अपवाद वगळता कुठलही संकट हे झाड झेलू शकतं. आणि हे नफा देणारं फळ आहे. फक्तं त्याची नीट काळजी घ्यावी लागते.
एका एकरात त्यांची ही आमराईत पसरलेली आहे आणि त्यात सर्वाधिक झाडं केशर ह्या आंब्याची आहे. त्याशिवाय हापूस, बादाम, तसेच गुहागरच्या कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी शोधलेला सिंधू नावाच्या आंब्याच्या जातीची झाडं ही लावली आहे.
हे सर्व आंबे ते कोणतही कृत्रीम औषध न वापरता नैसर्गिक पध्दतीने उगावतात. व्यापाऱ्यांना ते पूर्णपणे आमराईत पिकलेले आंबेच विकतात.
आंबे ते कोणत्या पध्दतीने पिकवतात?
आंब्यांची काळजी ते कशी घेतात?
ह्यात आंतरपिके कोणती घेतात?
केशर आंब्याची वैशिष्ट्य काय आहेत?
एका एकरात किती आंब्याची झाडं बहरली आहेत?
आंबा फळशेती का फायद्याची आहे आणि ती कोणी करावी?