गाभण शेळीची काळजी कशी घ्यावी? 2024

गाभण शेळीची काळजी कशी घ्यावीशेळीपालन हा कमी भांडवलात व कमी जागेत होणारा शेतीपूरक व्यवसाय आहे. अल्पभूधारकांसाठी अत्यंत फायदेशीर आहे. बंदिस्त किंवा अर्धबंदिस्त जागेतही करता येण्यासारखा आहे. म्हणूनच दौंड तालुक्यातील मळद येथे असलेल्या ‘कपिला कृषी व गोट फार्म’ मधील शेळीपालनाची यशोगाथा आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

गाभण शेळीची काळजी कशी घ्यावी
गाभण शेळीची काळजी कशी घ्यावी


हा फार्म निलेश जाधव आणि राहुल डोले-पाटील यांच्या मालकीचा आहे. शेळीपालनाचा व्यवसाय वर्ष 2010 पासून ते करत आहेत. उस्मानाबादी शेळी पासून सुरुवात करून आज बोअर आणि बिटल शेळी चा व्यवसाय सुद्धा योग्य तर्हेने सांभाळत आहेत. त्यांच्याकडे जवळपास 250 शेळ्या आहेत ज्यापैकी बोअर जातीच्या शेळया 100 च्या आसपास तर बिटल जातीच्या शेळया 150 च्या आसपास आहेत.
बोअर ही दक्षिण आफ्रिकेतील वैज्ञानिक पद्धतीने तयार करण्यात आलेली शेळीची प्रजाती आहे. ही शेळी मुख्यत्वे मांस साठी उपयोगात आणली जाते. दक्षिण आफ्रिकेत विकसित झाल्या नंतर ऑस्ट्रेलिया मध्ये देखील या शेळीचे मोठ्या प्रमाणावर संगोपन केले जाऊ लागले. तेथून तब्बल 28 वर्षांपूर्वी म्हणजेच 1993 मध्ये ही बोअर शेळी एम्ब्रीओ स्वरूपात भारतात आणली गेली. महाराष्ट्रातील वातावरणात रुळत याच जमिनीवर तिची मोठ्या प्रमाणावर पैदास करण्यात आली.

गाभण शेळीची काळजी कशी घ्यावी
ही शेळी तब्येतीने धडधाकट आहे आणि तिच्यात रोगप्रतिकारक शक्ती जास्त आहे. ह्या शेळीची पचन क्षमता उत्तम आहे. त्यामुळे स्थानिक शेळ्यांना लागणारे खाद्य तिला सहज मानवते. तिची रवंथ करण्याची संस्था बळकट असल्यामुळे तिला विशेष असे खाद्य द्यावे लागत नाही. ही प्रजाती फार दूध देत नाही. परंतु हीची प्रजनन क्षमता खूप चांगली आहे. व पिल्ले जन्माला घालण्याचे प्रमाणही तुलनेने जास्त आहे.


कपिला कृषी व गोट फार्म मध्ये गाभण शेळीसाठी विशेष काळजी घेण्यात येते. गाभण असलेल्या शेळीच्या गाळ्यात कमी शेळ्या ठेवल्या जातात ज्यामुळे तिला वावरायला मोकळी जागा मिळते. तसेच शेळी राहत असलेल्या जागेचे वारंवार निर्जंतुकीकरण केले जाते. पिल्लू जन्माला आल्यावर त्याला कुठलाही रोग लागू नये याची विशेष काळजी घेतली जाते. External parasites पासून त्यांचे संरक्षण केले जाते. योग्य ती काळजी घेऊन शेळीपालन केल्यास ते नेहमीच जास्त परिणामकारक ठरते.

गाभण शेळीची काळजी कशी घ्यावी

गाभण शेळीची काळजी कशी घ्यावी


बोअर शेळी विकत घेताना कदाचित नवीन शेतकऱ्यांची फसवणूक होण्याची शक्यता उद्भवते. कथिया रंगाचे तोंड व पांढऱ्या रंगाचे शरीर असलेली प्रत्येक शेळी बोअर शेळीच आहे असे सांगितले जाऊ शकते. पण रंगाबरोबरच त्या शेळी चे गुणधर्म तपासून पाहणे गरजेचे आहे. तरुणांसाठी हा व्यवसाय भरपूर नफा देणारा ठरतो आहे. फळे अथवा भाज्यांच्या शेतीसारखी ह्याची किंमत बाजारात फार कमीजास्त होत नसल्यामुळे किंवा किमान कमी तरी निश्चितच होत नसल्यामुळे ह्यातून उत्पन्नाच्या विविध संधी निर्माण झाल्या आहेत. शिवाय सुरुवातीच्या काळात शेळीपालनाचे फार ज्ञान नसेल तर अश्या शेतकऱ्यांना कपिला कृषी व गोट फार्म तर्फे शेळीपालन करण्यासाठीचे प्रशिक्षणही देण्यात येत आहे.

Leave a Comment