गुरांचे चारा व्यवस्थापन कसे करावे?

मित्र मैत्रीणींनो, दुध व्यवसाय करत असताना, बरेच जण म्हणतात की आम्ही आमच्या जनावरांच्या चारा पाणी मधे, लसीकरणामधे, गोठ्याच्या देखभाली मधे, आरोग्यविषयक सुविधांमधे कोणतीही तडजोड केली नाही, पण तरीही आमची जनावरे उत्साही वाटत नाहीत, किंवा दूध उत्पादनात वाढ होत नाही. काय करावं हे कळत नाही.
पण मित्रांनो, जनावरांची सगळ्या बाजूनं निगा राखताना त्यांच्या शिंगा पासुन ते शेपटी पर्यंतच्या शरीराची आणि त्याच्या जनावरांच्या आरोग्यावर होणाऱ्या परिणामांविषयी किमान माहिती असणं आवश्यक आहे.
बरेच जण जनावरांची निगा राखताना, कान डोळे आणि कास व सडाची काळजी घेतात. पण ह्यात जनावरांच्या खुरांच्या वाढीकडेही तितकच लक्षात देणं गरजेचं असतं.

गुरांचे चारा व्यवस्थापन कसे करावे?


खुरांच्या नियंत्रित वाढण्याकडे आपण का लक्ष द्यावे ह्या बद्दल आधी थोडे जाणून घेऊया.
जनावरांची खुरे, म्हणजे तळपायाचा भाग हा तुलनेनं माणसांच्या नखा सारखा वाढत असतो. ज्या प्रमाणे आपण नखे काही दिवसानी कापतो आणि त्यांची वाढ रोखतो कारण त्याने आपल्या तळहाताच्या हालचालीवर परीणाम होऊ नये त्याचप्रमाणे खुरांचे देखील आहे.
खुरे वाढल्याने जनावरांच्या शरीराचा भार एखाद्याच बाजूने झुकतो, आणि जनावरांच्या चालण्यावरही परीणाम होतो. अश्या अवस्थेत जनावरे जेव्हा चरण्यासाठी फिरतात तेव्हा ह्या असमान भाराचा त्यांना चालताना त्रास होतो आणि चारा खाण्यावर त्यांचा परीणाम होतो. त्यातही रवंथ करण्यावरही परीणाम होतो. ह्या सगळ्याचा अर्थातच परीणाम त्यांच्या दुधाच्या उत्पादनावरही होतो. त्यामुळे ह्या खुरांची निगा राखणे फार गरजेचे आहे.
ह्यासाठी खुरांचे साळणी केली जाते. आणि ती ही शास्त्रशुद्ध पध्दतीने करणं गरजेचे आहे.
खुर चाळणी यंत्रात खुर चाळणी शास्त्रशुद्ध पध्दतीने कशी केली जाते हे आपण आजच्या व्हीडीओ मधे पाहणार आहोत.
ह्यात खुर चाळणीचं महत्व आणि त्याची सविस्तर पध्दत ह्याबद्दल आपण माहीती घेतली आहे.

Leave a Comment