आमच्या दुग्धव्यावसायिक मित्रांनो, तुम्हाला तर माहीतीच असेल की दुग्धव्यवसायात पाउल टाकताना बऱ्याच गोष्टींची आधीच माहीती करून घेणं गरजेचं असतं,आधी सुरू करून मग अनुभवातूनच माहिती होईल, असं प्रत्येक व्यावसायिकाला जमेल असं नाही. काही लोकांकडे एकदाच लावता येईल इतकेच भांडवल असते. माहिती ब घेता जर हा व्यवसाय सुरू केला आणि एखाद्या गैरसमजातून अथवा फसवणूकीतून जर घाटा झाला तर परत व्यवसाय उभा करणं अश्या लोकांना श्यक्य नसतं. आता फेसबुक, यूट्यूब, विविध वेबसाईट्स, असल्या मार्गाने ह्या व्यवसायात नव्याने उतरू पाहणाऱ्यांसाठी भरमसाठ माहिती उपलब्ध आहे. ग्रेट महाराष्ट्राने नेहमीच अशी उपयुक्त माहीती तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे. तसेच ज्या व्यावसायिकांना आपल्या डेअरीची माहीती लोकांपर्यंत पोहोचवायची आहे, अश्या व्यावसायिकांसाठीही ग्रेट महाराष्ट्रने मंच उपलब्ध करुन दिलाय.
आज आम्ही अश्याच मराठी असलेल्या पण हरीयाणातल्या कर्नाल जिल्ह्यातून व्यवसाय करणाऱ्या राजेन्द्र दुधाने ह्यांच्या गोठा व्यवस्थापना विषयी माहिती तुम्हाला देणार आहोत.
राजेन्द्र दुधाने ह्यांच्या डेअरीचं नाव आहे मराठा डेअरी फार्म. हे हरीयाणातल्या, कर्नाल जिल्ह्यातल्या दादुपूर रोडान गावात राहतात. हे गाव कर्नाल स्टेशन पासून केवळ १० किलोमीटर च्या अंतरावर आहे. इथेच त्यांचा पशुपालन व्यवसाय ते बऱ्याच वर्षांपासून करताय. म्हणजेच ह्या व्यवसायात त्यांचा अनुभव दांडगा आहे.
त्यांच्या कडे एच एफ आणि जर्सी गाई आहेत. तसेच एबीएस आणि डेन्मार्क गाई ही त्यांच्याकडे उपलब्ध आहेत. त्यांच्याकडे २० लीटर पासून ते ४० लीटर पर्यंत दुध देण्याची क्षमता असणाऱ्या गाई ही उपलब्ध आहेत. ह्या शिवाय गीर गाईंचा व्यवसाय देखील ते करतात आणि म्हशींमधे मुऱ्हा जातीच्या म्हशीही त्यांच्याकडे उपलब्ध आहेत.
आता पाहूयात ह्या सगळ्या गायांची किमती काय आहेत.
तर मित्रांनो, त्यांच्याकडे कमीत कमी ४० हजाराच्या किमतीला एक गाय येते तर जास्तीत जास्त एक लाखा पर्यंत किंमती असलेल्या गाईगी त्यांच्याकडे उपलब्ध आहे. ह्या किमती गाईच्या जाती, वंश, दुध देण्याची क्षमता आणि वेतांची संख्या ह्या गोष्टींवर अवलंबून असते.
मराठा डेअरी फार्म मधे डेन्मार्क, ए बी एस ड्ब्ल्यू डब्ल्यु इ अश्या सिमंन्स ने व्यायलेल्या गाई देखील उपलब्ध आहेत. म्हणजेच मराठा डेअरी फार्म मधे तुम्हाला अनेक प्रकारच्याअ गाईंच्या जातीचे प्रकार मिळतील, तुमच्या आवडी आणि सायी नुसार तुम्ही इथून त्यांची खरेदी करून आपल्या गोठ्यात त्यांचा समावेश करू शकता. इथे तुम्हाला तुमच्या बजेटचा आणि गोठ्याच्या जागेचा विचार करुन कोणती गाय तुम्हाला जास्त फायद्याची आहे ह्याबद्द्ल मार्गदर्शनही केलं जाईल.
आज महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मराठा डेअरी फार्म कडून आपली जनावरे खरेदी केली आहेत आणि त्यांच्या दर्जा विषयी हे सर्व शेतकरी समाधानी असल्याचं ते सांगतात.

जनावरांचा दर्जा उत्तम ठेवण्यासाठी मराठा डेअरी फार्म मधे विशेष काळजी घेतली जाते. जनावरांना पौष्टिक चार दिला जातो, त्यांच्या राहण्याच्या जागेची स्वच्छता ठेवलेली असते, उन, वारा, थंडी, पाऊस ह्यांपासून त्यांचा बचाव होईल अश्या ठिकाणी त्यांना ठेवलं जातं, गाभण गायांची विशेष काळजी घेतली जाते, त्यांना तुलनेनं जास्त चारा दिला जातो, त्यांना वेगळं ठेवलं जातं. तसेच नव्या जन्मलेल्या कालवडींची देखील योग्य काळजी घेतली जाते. कालवडींसह सर्व जनावरांचे वेळोवेळी लसीकरण केले जाते आणि त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जाते. ह्यासाठी विशेष तज्ञ ही बोलावले जातात.
ह्या सर्व गोष्टींमुळे मराठा डेअरी फार्म मधे असलेल्या जनावरे उत्तम दर्जाची आणि धष्टपुष्ट असतात.
राजेंद्र दुधाने ह्यांनी आपल्या अनेक वर्षांच्या अनुभवातून हा व्यवसाय वाढवला आहे. देशभरात त्यांच्या डेअरी फार्मचे पशू ते पाठवत असतात.
तेव्हा तुम्ही ही पशू खरेदी करण्याचा विचार करत असाल तर स्क्रीनवर दिसणाऱ्या नंबर कर संपर्क करा आणि आपल्या गोठ्यासाठी दर्जेदार गाई मराठा डेअरी फार्म मधून घेऊन या.
तर मित्रांनो ही होती मराठा डेअरी फार्म विषयी संपूर्ण माहिती. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये जरूर कळवा. आणि माहिती आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. शेती आणि दूध व्यवसाय संबंधी अधिक माहिती हवी असल्यास पाहत राहा ग्रेट महाराष्ट्र चॅनल.
तुमच्या पाठिंब्याबद्दल धन्यवाद