गोठा व्यवस्थापन माहिती…

मित्रांनो, तुम्ही गोठा व्यवस्थापन करत असाल तर तुम्हाला माहीत असेल तर जनावरांच्या संगोपनात त्यांचं आजारपण एक मोठं आव्हान आपल्यासमोर असतं. लसीकरण वेळच्यावेळी करणं, उन, वारा, पाऊस ह्या पासून त्यांना सुरक्षित ठेवणं, गोठ्याची स्वच्छता ठेवण अश्या अनेक गोष्टी आपल्याला कराव्या लागतात. जनावरांच्या आरोग्य जितकं उत्तम तितकं दुध उत्पादन जास्त हे एक समीकरण आहे. त्यामुळे त्यांच्या आरोग्याची काळजी हा दुग्ध व्यावसायिकांसाठी महत्वाचा मुद्दा आहे.
कित्येक व्यावसायिक असं सांगतात की आमचा जनावरांच्या आरोग्यावर कधी कधी इतका जास्त खर्च होतो की दुधाच्या उत्पन्नाचा अर्धा वाटा त्यातच जातो.
पशु वैद्याचा खर्च, औषधाचा खर्च, असे एक ना अनेक खर्च होतात. त्याला शेतकरी वैतागतो. पण पशूपालन हा जिवंत संपत्ती सांभाळण्याचा व्यवसाय असल्याने हा खर्च तर होणारच ना?
हा खर्च आपण कमी करू शकतो का? तर अर्थातच हो.
काय करता येईल तो कमी करण्यासाठी? तर तेच जे आपण माणसांच्या आरोग्यासाठी करतो.
आजही कोकणात, किंवा इतर गावात आणि आदीवासी पाड्यात रोगांवर झाड पाल्यांचा उपचार करतात. शहारातही सर्दी खोकला झाल्यावर बरेच जण आधी पाण्याची वाफ, हळद दुध, सुंग्ट असे घरगुती किंवा ज्याला आपण गावठी उपाय म्हणतात ते आपण करतो. त्यालाच पारंपारिक उपाय म्हणतात.
तर ग्रेट महाराष्ट्र तुमच्यासाठी जनावरांच्या रोगांवर अश्याच काही पारंपरिक उपायांची माहिती येत्या काही व्हिडीओंच्या मालिकेत घेऊन येणार आहे. त्यामुळे येते काही दिवस येणारे व्हिडीओ पाहणं चुकवू नका.
आज आपण पाहणार आहोत जनावरांबा सर्वात जास्त सतावणाऱ्या लाळ्या खुरकत ह्या रोगावरच्या पारंपरिक उपचारा बद्दल.
हा एका विषाणूमुळे होणारा रोग आहे. हा रोग हवे मार्फत, दुषित खाद्या द्वारे अथवा रोगी जनावरांच्या संपर्कात येण्याने होत असतो.
हा चार प्रकारच्या विषाणूने होतो. जसं की आशिया १ व त्याच्या उपजाती तसेच ओ ए सी ह्यामुळे हा रोग होतो.

गोठा व्यवस्थापन माहिती...

हा रोग जनावराला झाला हे तुम्ही कसं ओळखाल?
तर हा रोग झाला की जनावरांच्या तोंडातून चिकट लाळ गळत राहते, जिभेवर, हिरड्यांवर, खुरड्यावर जखमा होऊ लागतात. जनावरांना ताप भरतो. ते चारा खाणं कमी करतात.कामाला लावलेले बैल ह्यामुळे थोड्या काळासाठी निकामी होतात.

ह्या रोगावरच्या सध्याच्या उपचारांचा खर्च टाळायचा असेल तर पाहुयात की पारंपरिक पध्दतीने ह्यावर काय व कसा उपाय करता येतो.
सोप्प आहे. चला पाहूया.
एक मूठभर कुप्पी किंवा पेटारी चे पान घ्या. दहा पाकळ्या लसूण घ्या, एक मूठभर कडुनिंबाची पाने घ्या. 20 मिली लिटर खोबरेतेल घ्या, दहा ग्रॅम हळद घ्या, मेंदीचे पाणी एक मूठभर घ्या, तुळशीची पाने एक मूठभर घ्या, आणि हे सगळं एकत्र करून त्याची एक पेस्ट तयार करा.
आता या पेस्टमध्ये 250 मिलिमीटर खोबरे तेल टाकून ते उकळून घ्या. आणि पूर्ण थंड होऊ द्या.
आता यानंतर जनावरांच्या खुरा वरची जखम साफ करून घ्या. त्यानंतर तयार केलेली पेस्ट जखमेवर ती लावा आणि गरज वाटल्यास बँडेज करून घ्या.
जखमेमध्ये आळ्या झाले असतील तर खोबरेल तेलामध्ये कापूर टाकून ते तेल जखमेवर लावा‌ किंवा सिताफळाच्या पानांची पेस्ट जखमेवर लावा.
अशा प्रकारे तुम्ही पारंपरिक पद्धतीने खुरकत वर उपचार करू शकता.
तर मित्रांनो, ही होती खूपच या रोगावर पारंपरिक पद्धतीने उपचार कसे करावे ह्या विषयी संपूर्ण माहिती. हे माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये जरूर कळवा.

Leave a Comment