मित्र-मैत्रिणींनो, दुधाचा व्यवसाय करायचा विचार करत असताना सर्वात महत्त्वाचं काय असतं बरं? अशी कोणती गोष्ट असते की जी दुधाचा व्यवसाय प्रसिद्ध होण्यास मदत करते? अर्थातच दुधाचा दर्जा. कोणताही सामान्य ग्राहक सुद्धा दुधाचा दर्जा हलका आहे कि उत्तम आहे हे लगेच ओळखतो. आणि त्याला जर दर्जा मिळत नसेल तर तो त्या व्यावसायिकाकडे परत फिरकत देखील नाही. कारण ग्राहक पैसे मोजत असतो. त्याला त्या पैशांचा योग्य मोबदला म्हणजेच उत्तम दर्जाचे दूध त्याला मिळणं गरजेचं असतं.
आता उत्तम दर्जाचं दूध उत्पादन करायचं असेल तर जनावरांच्या खाद्य कडे व्यवस्थित लक्ष देणं गरजेचं असतं. त्यांचं पोषण त्यांचा आरोग्य हे खूप महत्त्वाचं असतं. उत्तम दुधाच्या दर्जासाठी जनावरांच्या आहारात मिनरल मिक्सर असणं गरजेच असतं. त्यामुळे त्यांचा आरोग्य सुधारतं दुधाचा दर्जा सुधारतो आणि गाई व म्हशी गाभण राहण्याचे कुठलाही अडथळा येत नाही.
शिवाय गाई माजावर येणार म्हशी माजावर येणे याही गोष्टी आहारावर अवलंबून असतात. त्यामुळे जनावरांचे पोषण किती महत्त्वाचा आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल.

एग्रोवेट ही अशीच गाई व मशीनचे खाद्य बनवणारी कंपनी आहे. गेल्या 33 वर्षांपासून ही कंपनी पशुखाद्य बनवण्याचे काम करते. या व्यवसायात ही त्यांची तिसरी पिढी आहे. या तिसऱ्या पिढीतल्या यश कोठारी ग्रेट महाराष्ट्राच्या टीमने संवाद साधला.
पशुखाद्य बनवण्याच्या पद्धती, पशुखाद्य बनवताना घेतली जाणारी काळजी, तसेच ते बनवताना कोणतं तंत्रज्ञान वापरलं जातं याची माहिती आम्ही त्यांच्याकडून जाणून घेतली.
तसेच एग्रोवेट कंपनीचे वैशिष्ट्य काय, दुग्ध व्यावसायिकांसाठी तसेच लहान-लहान पशुखाद्य बनवणाऱ्या कंपन्यांसाठी एग्रोवेटदेऊ करते हेही त्यांनी या मुलाखतीत सांगितले. तसेच बोलताना त्यांनी पाश्चात्त्य तंत्रज्ञानाचा पहिल्यांदाच आपल्याकडे कशा प्रकारे वापर करण्यात आला ह्याबद्दल ही माहिती दिली.