मित्रांनो आणि मैत्रीणींनो, देशी गोष्टींच्या वापरात आपलेच असे काही फायदे असतात. भारतीय स्थानीक अर्थव्यवस्था त्यामुळे बाहेरच्या गोष्टींवर अवलंबून राहत नाही, आपल्याच इथे आढळणाऱ्या गाई, म्हशी, वस्तू उत्पादने आपल्याला लगेच उपलब्ध होतात, त्यांचा भाव कमी असतो, आणि स्वदेशी वापरत असल्याची एक भावना ग्राहकांच्या मनात येते. ब्रिटिश कालीन भारतात भारताची अर्थिक लुट करणऱ्या ब्रिटिश सरकारला स्वदेशी आंदोलनाने खुप मोठा फटका बसला होता.
ह्याच स्वदेशी बद्दल आता पुन्हा भारतीय जन मानसांमधे आता जागृती होताना पहायला मिळतेय. विशेषतः दुध व्यवसायात. पुर्वी गावातल्या प्रत्येक दाराशी असलेली गाय वा म्हैस त्या घराच्या आणि फार तर आजूबाजूच्या काही घरांच्या दुधाची गरज भागवण्याकरीता वापरली जात होती. ह्या गाई जास्त प्रमाणात देशी वंशाच्याच असायच्या. जस जसं दुधाला व्यवसायाचं स्वरुप आलं, त्याच्यात विकास होत गेला तस तसं कमी वेळात जास्त दुध आणि ग्राहकांची वाढती मागणी ह्या गोष्टींचा मेळ घालण्याची गरज वाटली आणि विदेशी गाई आणि म्हशी भारतात आणल्या जाऊ लागल्या.
कारण ह्या गाई एका वेतात विक्रमी दुध उत्पादन देतात. दुधाचा व्यवसाय जोरात चालावा म्हणून सर्वच व्यावसायिक ह्या विदेशी गायांना पसंती देउ लागले आणि भारतीय वंशाच्या गाई ह्या शर्यतीत मागे राहू लागल्या. .
गिर, साहिवाल, कांकरेज, राठी, खिल्लार, थारपारकर ह्यांची मागणी घटली.
पण आता जागृती वाढली आहे. स्वदेशी वंशाच्या गाई देखील दुध उप्त्पादनात सारखाच नफा देउ शकतात हे काहींच्या लक्षात आलं आणि आता स्वदेशी गायांची मागणी वाढायला सुरुवात झाली. स्वदेशी वंशाचे गोधन हे काटक असते, ते भारतीय वातावरणाशी जुळवून घेते, कमी आजारी पडते आणि त्यामुळे दुध जरी कमी देत असल्या तरी इतर खर्च वाचतो आणि म्हणून ह्यांच्या पालनाचा एकूण जमाखर्च आणि नफा हा विदेशी गाई पालना इतकाच होतो असा अनुभव यायला लागला. .
पण आता तुम्ही म्हणाल की बरोबर आहे हो, पण ह्या देशी वंशाच्या गाया आणायच्या म्हणल्यावर पंजाब, हरीयाणा, राजस्थान इत्यादी बाहेर राज्यातून आणाव्या लागतात. प्रवासाचा खर्च पडतो, प्रवासात गाभण गाय दगावण्याची श्यक्यता असते. हो तुमचं म्हणणं खरं आहे. हे लक्षात घेऊनच गौ गौ फार्म ने ह्या सर्व गाई महाराष्ट्रात, त्यातल्या त्यात पुण्यात उपलब्ध होतील अशी सोय तुम्हाला करुन दिलेली आहे.

गौ गौ फार्म सर्व प्रकारच्या गोधनाचा प्रतिपाल आणि व्यवसाय करते. उच्च प्रतीच्या गाई म्हशी गौ गौ कडे नेहमी उपलब्ध असतात.
आता गौ गौ ने गिर, साहिवाल, राठी, कांकरेज थारपारकर इत्यादी गाई तुम्हाला चक्क पुण्यात उपलब्ध करुन दिल्या आहेत… आणि त्या मोठ्या संख्येने म्हणजेच ८० ते १०० गाई गौ गौ फार्मकडे पुण्याजवळच उपलब्ध आहेत.
म्हणजेच आता देशी गाई विकत घ्यायच्या असतील तर पंजाब हरीयाणा इत्यादी बाहेर राज्यात जाण्याची कटकट वाचते आणि थेट महाराष्ट्रातूनच त्या विकत घेऊन तुम्ही आपल्या गोठ्यात आणू शकतात.
ह्यांच्याकडे असणाऱ्या सर्व गाई ह्या उच्च प्रतीच्या असतात. त्याचा अनुभव तुम्ही ह्या गायांकडे बघून घेऊ शकता किंवा प्रत्यक्ष जाऊनही खात्री करु शकता.
विशेष म्हणजे जरी ह्याच फार्म पासून ते तुमच्या गोठ्या पर्यंत गायांना पोच करायची सुविधा ही गौ गौ फार्म देउ करतय. म्हणजे तुम्ही केवळ गाई निवडा, पत्ता सांगा आणि प्रवासाची चिंत सोडून द्या. तुम्ही निवडलेल्या गाई तुम्ही दिलेल्या पत्त्यावर निसंशय पोहोचतील.
स्वदेशी गायांच्या गोठ्याच्या यशोगाथा ग्रेट महाराष्ट्रने वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवलीय. अजूनही तुम्ही त्या पाहू शकता. नुसतं दुधच नाही तर अनेक व्यावसायिकांनी देशी दुधाने तुप, लोणी, साबण, गोमूत्र, अश्या पंचगव्याचा व्यवसाय देखील सुरु केला आहे.
तेव्हा, जर तुम्ही देशी गाईंचा गोठा चालवण्याचा विचार करत असाल तर स्क्रिन वर दिसणाऱ्या गौ गौ फार्म च्या संपर्क क्रमांकावर कॉल करा आणि आपली ऑर्डर सांगा.
तुम्हाला ह्याबाबतीतले मार्गदर्शनहेर गौ गौ फार्म करेल आणि कोणत्या वंशाची गाय जास्त योग्य असेल ह्याची कल्पना तुम्हाला देइल.