मित्रांनो पशुपालन व्यवसाय सुरू करायचा म्हंटलं की सुरुवात कुठून करावी कशी करावी हे प्रश्न अर्थातच पडतात. नव्याने या व्यवसायात उतरु पाहणारा तरुणांना याचे योग्य मार्गदर्शन मिळणं गरजेचं असतं. गोठ्यासाठी ची जागा, त्यासाठी भांडवल या सगळ्याची जुळवाजुळव करावी लागते. नंतर आपल्या गोठ्या मध्ये कुठल्या जातीची गाय व म्हैस ठेवावी, कुठल्या प्रकारची गाय व म्हैस दुधाच्या व्यवसायासाठी उत्तम असते याची माहिती घेत पुढचं पाऊल टाकावे लागते. बऱ्याच वेळेला गाय आणि म्हशी ची खरेदी पशु बाजारातून केली जाते. किंवा बाहेरच्या राज्यातून जसे की हरियाणा पंजाब राजस्थान या राज्यातून या गायी व म्हशी मागवल्या जातात. पण बऱ्याच शेतकऱ्यांचा, व्यावसायिकांचा असा अनुभव आहे की बऱ्याचदा खरेदीत फसवणूक झालेली आहे. उदाहरणार्थ ज्या जातीची गाय व म्हैस मागवली होती तिच्या व्यतिरिक्त भलत्याच जातीची गाय व म्हैस आपल्याला पोच केली जाते. किंवा काही वेळेला गाय व म्हैस गोठ्यात आणल्यानंतर लगेच दगावल्या चे अनुभव आहेत. आणि एकदा का पैसे हाती पडले की विक्रेता गाय व म्हशी ची जबाबदारी नाकारतात.
आणि विक्रेता इतक्या लांब असल्याने पुन्हा त्याच्याकडे जाऊन पैशांची मागणी करणं गरीब शेतकरी आणि व्यावसायिकांसाठी अवघड बनून जाते. असे अनुभव आले की दूध व्यवसाय संबंधी नकारात्मक मानसिकता तयार होते.
जनावरे खरेदी करताना काय काळजी घ्यावी यासंबंधी एक व्हिडिओ आम्ही ह्या पूर्वी आमच्या चैनल वर बनवलेला आहे. तो तुम्ही पाहू शकता. आणि त्यानुसार भरलेल्या जनावरांच्या बाजारातून खरेदी करू शकता.
पण काळजी घेणे संपूर्णतः तुमच्या हातात आहे.

त्यामुळे व्यवसाय सुरु करण्याच्या वेळेला अशा ठिकाणांहून किंवा माणसांकडून जनावरे खरेदी करावी ज्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवता येईल. ज्यांना गाय व म्हशी ची जबाबदारी घेण्यात कुठलीही अडचण नसेल.
सोबतच त्यांच्याकडे आलेल्या ग्राहकाला ते जनावरांच्या खरेदीबाबत योग्य मार्गदर्शनही करतील आणि त्यांना जनावरांच्या दर्जाबद्दल खात्रीही देतील.
अशीच एक डेअरी फार्म आहे जिचं नाव आहे गोकुळ डेयरी फार्म. ही फॉर्म हरियाणा राज्यातल्या कर्नाल येथे आहे.
येथे देशी गाई जसे की गीर साहिवाल राठी तसेच मुऱ्हा जातीची म्हैस देखील त्यांच्याकडे उपलब्ध आहे.
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे कोणत्या किमतीला आणि कोणती गाय विकतात? आणि मुऱ्हा म्हैस खरेदी करायची तर तीची किंमत काय असेल? गाभण गाईची आणि म्हशी ची किंमत काय असेल?
तर गोकुळ डेरी फार्म मध्ये एका गाईची किंमत 45000 ते 80 हजार या दरम्यान असते.
आणि गाभण असलेल्या मुऱ्हा म्हशी ची किंमत 70 ते 90 हजार इतकी असते.
गाई-म्हशींचे दूध उत्पादनक्षमता बारा ते वीस लिटर इतकी असते.
गिर साहीवाल राठी या देशी वंशाच्या गाई सध्या दूध व्यावसायिकांना मध्ये लोकप्रिय होत आहेत. देशी वंशाच्या गाईंना प्राधान्य दिले जाताना दिसते आहे. वाढ कशी करता येईल याबद्दल संशोधन करत आहे. या देशी वंशाच्या गाई सध्या दूध व्यावसायिकांना मध्ये लोकप्रिय होत आहेत. देशी वंशाच्या गाईंना प्राधान्य दिले जाताना दिसते आहे. वाढ कशी करता येईल याबद्दल संशोधन करत आहे.
तसेच म्हशीच्या दुधाचा व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांमध्ये मुऱ्हा म्हैस ही प्रसिद्ध आहे.
ही सर्व जनावरे गोकुळ डेअरी फार्म यांच्याकडे उपलब्ध आहे.
त्याची प्रथम चाचणी करून घेणे आवश्यक असते. ती तुम्ही प्रत्यक्ष गोठ्यात जाऊन कळू शकतात. पहिले तीन दिवस त्या ठिकाणी राहून दूध उत्पादन क्षमता तपासून घ्यावी. गाय वा म्हशीचे आरोग्य तपासणी करून घ्यावी. गोकुळ डेअरी फार्म उच्च दर्जाच्या गाई व म्हशी त्यांच्या गोठ्यात ठेवत असते. त्यामुळे त्यांच्या दर्जाबद्दल शंका तर नाहीच पण ग्राहकांची खात्री करून घ्यायची त्यांची तयारी असते.
गोकुळ डेअरी फार्म ने आजवर भारतात अनेक राज्यांमध्ये गाय व म्हशींची विक्री केलेली आहे. त्यांच्या ग्राहकांच्या त्यांच्यावर विश्वास बसलेला आहे. त्यामुळे तुम्ही जर पशुपालन व्यवसायाचा विचार करत असाल तर स्क्रीनवर दिसणाऱ्या नंबर वर संपर्क साधून तुम्हाला हव्या असलेल्या गाय व म्हशी ची ऑर्डर आजच द्या. किंवा केवळ चौकशीसाठी ही तुम्ही संपर्क करू शकता.
मित्रांनो, लोक डाऊन आता हळूहळू उघडतोय. अर्थव्यवहार हळूहळू पूर्वीच्या गतीत यायला लागलेला आहे. पण बऱ्याच तरुणांच्या असं लक्षात आलेलं आहे की नोकरी ही बिन भरवशाची आहे. कोरोना वा इतर तसेच काही संकट आले की नोकरी टिकेल की नाही ही भीती सतत नोकरदारांच्या मनात असते, म्हणून स्वतःचा व्यवसाय हा कधीही फायद्याचंच असतो. दुधाच्या व्यवसायात यश आहे फायदेशीर ठरू शकतो हे अनेक व्यावसायिकांनी दाखवून दिलेल आहे. व्यवसायात फार तर तोटा होईल पण व्यवसाय नोकरी सरकारी निघून जात नाही. आणि तो त्याचा फायदा करण्यासाठी वेळ लागत नाही. व्यवसायाचे योग्य मार्गदर्शन आणि योग्य व्यवस्थापन केलं की तो नोकरी पेक्षा हि जास्त नफा कमावून देतो. त्यात दूध ही अशी गोष्ट आहे की जी रोजच्या दैनंदिन आहाराचा भाग झालेली आहे. त्यामुळे दुधाची मागणी कधीच कमी होत नाही. दुधाच्या किमती वर खाली होती पण मागणीच नाही असं कधीच होत नाही. त्यात दूध आता जीवनावश्यक वस्तूंमध्ये गणला जातं. त्यामुळे संकटाच्या वेळेत ही दुधाची मागणी आहे तशीच असेल किंवा कदाचित वाढेल देखील. त्यामुळे निसंशय हा व्यवसाय फायद्याचा आहे.
तेव्हा तुमच्या गोठ्यातल्या जनावरांच्या ऑर्डर आत्ताच गोकुळ डेअरी फार्म ला द्या आणि व्यवसायला निसंकोच सुरुवात करा.
तरीही होती उत्कृष्ट जनावरे कुठे मिळतील या विषयी माहिती. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये जरूर कळवा.
Thank you for your sharing. I am worried that I lack creative ideas. It is your article that makes me full of hope. Thank you. But, I have a question, can you help me?