How To Start Dairy Business In India? दैनंदिन दूध उत्पादन… . दुग्धव्यवसायाच्या यशाची गुरुकिल्ली… 2024

How To Start Dairy Business In India

मागील अनेक वर्षांपासून दुग्धवयवसाय पारंपरिकरित्या केला जाणारा शेतीपूरक व्यवसाय आहे. एकूण दूध उत्पादनात भारत जगात अग्रेसर आहे. पुरातन काळापासून चालत आलेल्या ह्या व्यवसायात बदल होवून त्यात भारताची मान जगात उंचावली आहे. यापूर्वीही ग्रेट महाराष्ट्र ने दुग्धव्यवसायाशी संबंधित माहिती देणारे काही व्हिडिओज बनविलेले आहेत. ते तुम्ही आमच्या चॅनलवर पाहू शकता.

How To Start Dairy Business In India

दुग्धव्यवसायाच्या यशाची गुरुकिल्ली जाणून घेण्यासाठी विविध दुग्धव्यावसायिकांचे मार्गदर्शन घेणे हा एक उत्तम मार्ग आहे. म्हणूनच आज तुम्हाला घेऊन आलो आहोत पुणे जिल्ह्यात मावळ तालुक्यातील वडगाव येथील आचार्य dairy farm मध्ये. हा फार्म स्नेहा किरण आचार्य गेल्या अनेक वर्षांपासून बघत आहेत. स्नेहा यांचे पती आणि दिर दुग्ध्यव्यवसायातच असल्यामुळे हळूहळू त्या देखील ह्या व्यवसायाकडे वळल्या. बघता बघता त्यांचा दुग्धव्यवसायातील रस वाढला.

महाराष्ट्रातील 25 ते 30 म्हशी असलेला आचार्य dairy farm त्या स्वतंत्रपणे सांभाळतात. त्यांचा एक फार्म हरियाणा राज्यातही आहे.

How To Start Dairy Business In India

तेथे देशातील सर्वोत्तम पाच जातीच्या बैलांचा उपयोग करून म्हशींचे ब्रीडिंग करण्यात येते. त्यामुळे येथे उत्तम जातीच्या म्हशी तयार होतात.

How To Start Dairy Business In India
How To Start Dairy Business In India

वडगाव येथील आचार्य डेअरी फार्म मध्ये असलेल्या सर्व म्हशी ह्या मुर्हा जातीच्या आहेत. ह्या म्हशी बारा ते वीस लिटर पर्यंत दूध देवू शकतात. ह्या breeds सुद्धा हरियाणातील फार्म मधून आणलेल्या आहेत. ह्या ब्रीड इतर जतींपेक्षा जास्त दूध देण्याची क्षमता असलेल्या आहेत. फार्म मधील जनावरांसाठी 4 ते 5 कामगार आहेत. येथे manually milking केले जाते. 200 ते 500 लिटर पर्यंत दैनंदिन दूध उत्पादन होते. बॉटल पॅकिंग द्वारे होम डिलिव्हरी करून तसेच सेलिंग काउंटर लावून सुध्दा दूध विक्री करण्यात येते.

How To Start Dairy Business In India

How To Start Dairy Business In India


How To Start Dairy Business In India

यासोबतच हरियाणातील फार्म मध्ये त्यांनी स्वतः breeding केलेल्या उत्तम जातींच्या म्हशी विक्रीसाठी उपलब्ध आहेत. ह्या म्हशींची दूध उत्पादन क्षमता आणि दुधाची गुणवत्ता खूप चांगली आहे. शेतकरी फार्मला भेट देऊन म्हशीची निवड करू शकतात. दुग्धवयवसाय करताना म्हशींची निवड योग्य प्रकारे करणे ह्याला खूप महत्त्व आहे. म्हणूनच आचार्य डेअरी फार्म मध्ये साधारण 20 ते 25 लोकांची राहण्याची आणि जेवणाची मोफत सोय केलेली आहे. शेतकरी 4 ते 5 दिवस राहून स्वतः म्हशींची पाहणी करू शकतात.


साधारणतः प्रत्येक घरात दूध ही प्रत्येकाची प्रार्थमिक गरज असते. ह्या कारणाने दुधाचे भाव कितीही वर खाली झाले तरीही दुग्धव्यवसायाला मरण नाही. तरुण शेतकऱ्यांसाठी हा व्यवसाय एक मोठी संधी आहे. आचार्य डेअरी फार्म मध्ये एका म्हशिमागे खर्च वजा करता वीस हजार रुपये नफा मिळविता येतो. शिवाय ह्या डेअरी फार्म मधील दूध आणि दुधाळ जनावरे यांची मोठ्या प्रमाणावर विक्री होते.
तर ही होती स्नेहा किरण आचार्य ह्यांच्या दुग्ध व्यवसाय ची यशोगाथा.

Leave a Comment