मित्रांनो दुग्धव्यवसाय हा शेतीला जोडधंदा म्हणून शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरतो आहे. तसेच काही व्यवसायिक याचा मूळ धंदा म्हणून विचारही करत आहेत. भारतात दुग्ध व्यवसाय म्हणावा तितक्या प्रमाणात वाढत नाहीये. पण आशा आहे की येत्या काही काळात दुग्ध व्यवसायाला पसंती मिळेल. सुशिक्षित तरुण सुद्धा सध्या या व्यवसायाकडे वळताना दिसतात. हा व्यवसाय जागेची आणि पैशांची अशी दोघांची गुंतवणूक करून सुरू करावा लागतो. त्यामुळे ही गुंतवणूक करण्याआधी तरुण खूप विचार मंथन करतात. कारण हे धाडस करायचं असेल तर त्या विषयी संपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे. नव्याने या व्यवसायात उतरू पाहणाऱ्या तरुणांना मार्गदर्शन मिळणं आता सोपे झाले आहे. पूर्वी युट्युब गुगल अशी माध्यमे नव्हती. तसेच आज ज्याप्रकारे जगात कुठेही संवाद साधता येतो, कुठलीही माहिती मिळवता येते, तज्ञांशी बोलता येते तस पूर्वी नव्हतं. त्यामुळे आज व्यवसाय सुरू करताना तुम्ही पूर्णपणे माहिती घेऊन व्यवसाय सुरू करण्याचे धाडस करू शकता.
म्हणूनच ग्रेट महाराष्ट्र तुमच्यासाठी या व्यवसायातल्या वेगवेगळ्या माहिती तुमच्या पर्यंत पोहोचवतो. आम्हाला ठाऊक आहे तुम्हाला व्यवसाय सुरू करताना, गाई कोणत्या जातीच्या असाव्या, म्हैस कोणत्या जातीची उपयुक्त आहे, गोठा बंदिस्त असावा की मुक्त गोठा असावा, भारतीय वंशाच्या गाई उत्तम की विदेशी गाई उत्तम असे अनेक प्रश्न पडतात. ग्रेट महाराष्ट्र नेहमीच या प्रश्नांची उत्तरे तुमच्या पर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करत असतो.
आज आपण होल्स्टिन फ्रिजियन या गायीच्या जाती बद्दल जाणून घेणार आहोत.
हिला सामान्यतः एच एफ गाई असे म्हणतात. विदेशी वंशांच्या गाईंमध्ये सर्वाधिक दूध उत्पादन देणारी गाय म्हणून एच एफ गाय ओळखली जाते. भारतात दुग्धोत्पादनासाठी एचएफ गाई ला सर्वाधिक पसंती आहे. त्यामागे काही कारणे आहेत. एच एफ गायीची स्वतःची अशी काही वैशिष्ट्ये आहेत. आज आपण जाणून घेऊया एचएफ गाई चे फायदे काय तिचे वैशिष्ट्य काय आहेत आणि दुग्धोत्पादनासाठी तिला सर्वाधिक पसंती का दिली जाते.
होल्स्टिन फ्रिजीयन गाय मुळची हॉलंड देशातली आहे. ही गाय आकाराने मोठी असते. ह्या गायांचा रंग संपूर्ण पांढरा असतो. किंवा अंगावर काळे पांढरे पट्टे असतात. यातली काही गुरे लाल पांढर्या रंगाचे देखील असतात. पायाचा खालील भाग व शेपटीचा गोंडा पांढरा असतो. जगभरात ही गाय दुग्ध उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. हिचा दूध देण्याचा कालावधी तब्बल तीनशे दिवसांचा असतो. ही गाय सरासरी सर्वात जास्त म्हणजेच सहा हजार लिटर इतके दुध देते, आणि हेच आयुष्य सरासरी बारा वर्षांचे असते.
म्हणजेच ही गाय दिवसाला दहा ते बारा लिटर इतकं दूध देऊ शकते. या दुधातील फॅटचे प्रमाण तीन ते चार टक्के इतके असते. एच एफ गायचे साधारण वजन कमाल 580 किलो इतके असते.
या गाईचे पालन व्यवस्थित केले तर दुग्धोत्पादनासाठी हे अत्यंत लाभदायी आहे. तिच्या चाऱ्याचे पाण्याचे आणि गोठ्याचे नियोजन कसे करावे हे आपण पाहू.
एच एफ गायांना चारा त्यांच्या आवश्यकतेनुसार द्यावा.

मका ज्वारी बाजरी गहू चणे मक्याने तयार केलेला खुराक, टॅपिओका. ह्या गोष्टींचा समावेश त्यांच्या खुराकात होतो.
बाजरी ज्वारी मका हत्ती घास, सुडान घास, नेपियन बाजरी या गोष्टींचा समावेश त्यांच्या हिरव्या चाऱ्यात करावा.
इतर नेहमीच्या आहारात मुरघास गहू बाजरी ज्वारी चे पेंड, भुईमूग सोयाबीन अशा गोष्टींचा समावेश करावा. आहार देताना त्यात मिनरल मिक्सर असतील याची काळजी घ्यावी. मिनरल मिक्सर असल्यामुळे गाई गाभण जाण्यास त्रास होत नाही.
आता पाहूया त्यांची काळजी कशी घेतली जावी..
चांगल्या दूध उत्पादनासाठी गाईंना चांगल्या वातावरणाची गरज असते. गाईंचे उन्हापासून व प्रचंड थंडी आणि पावसापासून संरक्षण होईल अशा प्रकारचा भक्कम गोठा उभारणे आवश्यक आहे. तसेच गोठ्यातल्या इतर किडे आणि आणि माशांचा बंदोबस्तही करणे गरजेचे असते. तुम्ही बांधलेल्या गोठ्यामध्ये स्वच्छ हवा आणि स्वच्छ पाणी उपलब्ध होईल याची काळजी घ्यावी. गोठा बंदिस्त असेल तर त्याची वेळोवेळी साफ-सफाई करावी. गायींना वेळोवेळी अंघोळ घालावी. थंडी पासून वाचण्यासाठी गोठ्यात हाय वोल्टेज बल्प लावावेत किंवा शेकोटी करत राहावे.
गाईंसाठी ज्या कुंडात चारा किंवा खुराक टाकला जातो ते कुंड मोठे असावे. जेणेकरून चारा किंवा खुराक खाण्यात गाईंना अडचणी येणार नाहीत. तसेच पाण्याचे कुंड देखील मोठे असावे.
शक्यतो गोठा मुक्त गोठा असावा. गायांचा ऊन वारा पावसापासून संरक्षण होईल एवढ्या साठी शेड बांधावे आणि इतर वेळी गुरांना मोकळे सोडावे. असे केल्याने पुढे आनंदी राहतात. बांधून ठेवलेल्या गुरांना तुम्हाला स्वतःहून पाणी पाजावे लागते त्यांना तहान लागल्यास ते स्वतःहून पाणी पिऊ शकत नाही. याचा परिणाम त्यांच्या पचनसंस्थेवर होतो आणि पचन संस्था बिघडली की त्याचा परिणाम दूध उत्पादनावर होतो. त्यामुळे मुक्त संचार गोठा असेल तर गुरे हे हवं तेव्हा पाणी पिऊ शकतात. तसेच वागू शकतात त्याने त्यांच्या पोटाचा व्यायाम होतो आणि पचन संस्था उत्तम राहते आणि दूध उत्पादनास त्यासाठी मदत होते.
गोठ्यातली गाय गाभण असेल आणि तिची योग्य काळजी घेतली गेली असेल तर सुदृढ कालवडी किंवा वासरे जन्माला येतात. यासाठी गाभण गायांना जास्त चारा आणि खुराक द्यावा. वैद्यांकडून त्यांची वेळोवेळी तपासणी करून घ्यावी. इतर चिडक्या गाईंपासून त्यांना वेगळं ठेवावं.
वासरे की कालवडी जन्माला आले की त्यांच्या नाका जवळचा चिवट पदार्थ पुसून टाकावा. वासरू कींवा कालवडी श्वास घेत नसेल तर त्याच्या छातीवर दबाव देऊन त्याला श्वास घेण्यास मदत करावी. शरीरापासून दोन सेंटीमीटर च्या अंतरावर बेंबी ठेवून नाळ कापावी. पाण्यात 12 टक्के आयोडीन टाकून बेबी साफ करून घ्यावी.
एच एफ गाईंच्या कालवडी किंवा वासरांचा जन्म झाल्यानंतर सहा महिन्यांनी ब्रूसीलोसिस ची लस द्यावी. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार इतर आजारांचे लसीकरण करून घ्यावे. ही विदेशी वंशाची गाय असल्याने भारतीय वातावरणात जुळवून घेण्यासाठी त्यांना वेळ लागतो. त्यामुळे त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे असते.
पण या गाईंच्या दूध उत्पादन क्षमतेमूळे क्या या व्यवसायासाठी अत्यंत फायद्याच्या आहेत.
तर मित्रांनो ही होती एच एफ गाई विषयी संपूर्ण माहिती. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये जरूर कळवा. आणि माहिती आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. शेती आणि दूध व्यवसाय संबंधी अधिक माहिती हवी असल्यास पाहत राहा ग्रेट महाराष्ट्र चॅनल.
तुमच्या पाठिंब्याबद्दल धन्यवाद. तुमच्यापर्यंत पोचवायला आम्हाला बळ मिळतं.