मित्रांनो, ग्रेट महाराष्ट्रने गेल्या काही दिवसां पासून गाय म्हशी यांना होणाऱ्या विविध आजारांवचे पारंपारिक उपचार काय आहेत ह्याबद्दल माहिती आणि मार्गदर्शन देणारे व्हिडीओज तुमच्यापर्यंत घेऊन येतो आहोत. आम्ही आशा करतो की आमच्या पशूपालक मित्रांना ह्याचा फायदा होईल. ह्या आजारावर मात करतांना पशुपालकांना खुप खर्च येतो आणि म्हणून त्यांचे नफ्याचे गणितही बिघडते. जसं आपण घरात सर्दी खोकला झाल्यावर आधी घरगूती उपचार करुन पाहतो तसेच घरगुती उपचान गाय म्हशींसाठीही करता येतात , ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणं हा आमचा हेतू आहे.
आज चा आपला विषय आहे जार किंवा वार न पडणे ह्या समस्येवरील उपचार.
तुच्यापैकी जे पशुपालन करतात त्यांना जार म्हणजे काय हे माहीत असेलच. पण ज्यांना अजून माहीत नसेल त्यांच्यासाठी सांगू इच्छितो की जार ‘वार’ म्हणजे गाय/म्हशीच्या गर्भाशयातील वासराच्या किंवा रेडकाच्या संरक्षणासाठी आणि त्याला आहार पुरवण्यासाठी गर्भाशयात तयार होणारा एक तात्पुरता अवयव. ही वार (जार) पातळ, चिकट, ताकदवान व पारदर्शक स्नायूंनी बनलेली असते. यामध्ये तीन आवरणे असतात. १२० ते १३४ मांसल गोळ्यांनी ही आवरणे गर्भाशयाला चिकटलेली असतात.
आता पाहुयात जार अडकण्याची कारणे.
गाय/म्हैस व्यायल्यानंतर वार तीन ते चार तासांत संपूर्णपणे बाहेर पडणे आवश्यक असते. आठ ते नऊ तासांत वार पडली नाही, तर पुढच्या एक-दोन तासांतच (म्हणजे व्यायल्यापासून १० ते ११ तासांतच) निष्णांत पशुवैद्यकाकडून ती काढून घ्यावी लागते. वार हाताने काढल्यास, पोटातून वा इंजेक्शनद्वारे किमान तीन दिवस गर्भाशयातसुद्धा औषधपाणी करणे गरजेचे असते.
वार आपसूक पडल्यास गर्भाशयात गोळ्या बसवून घेणे योग्य नसते. त्याने गर्भाशयाच्या आंतरपडद्याला इजा होते. गायीचे दूध देण्याचे प्रमाण कमी होते.

वार न पडता लोंबत असेल, तर कावळा, उंदीर, कुत्रा, मांजर हे प्राणी ती ओढणार नाहीत, याची खबरदारी घेणे महत्त्वाचे असते. लोंबणारी वार पडण्यासाठी तिला कोणतीही जड वस्तू बांधणे अयोग्य आहे. वार अडकू नये म्हणून, गाय विण्यापूर्वी ४५ दिवस तिची व्यवस्थित काळजी घ्यायला हवी. वारेची योग्य काळजी घेतल्यास, गाय/म्हैस पुढे नियमितपणे माजावर येते व गाभण राहते. या क्रिया त्रासदायक होत नाहीत.
विण्याच्या वेळी गाय/म्हैस अशक्त असेल, त्या निरोगी नसतील, त्यांच्यात कॅल्शियम, िझक, फॉस्फरस या खनिजांची कमतरता असेल तर त्यांच्या गर्भाशयाची हालचाल (आकुंचन/ प्रसरण) कमी प्रमाणात होते व त्यामुळे त्यांच्या गर्भाशयाचे स्नायू जास्त ताणले जातात व विताना त्यांना त्रास होतो. वासरू/ रेडकू बाहेर काढण्यासाठी त्यांच्या गर्भाशयात हात घातला असेल, काही संसर्गजन्य आजारामुळे वार चिकटून बसली असेल, गर्भपात झाला असेल, कासदाह झाला असेल किंवा विण्यापूर्वी अस्वच्छता असेल, तर व्यायल्यानंतर वार अडकू शकते.
आता पाहूया की जार अडकू नये यासाठी काय पारंपरिक आहे.
एक मुळा घ्या, साधारण दिड किलो भेंडी घ्या, गरजेनुसार मीठ आणि गुळ घ्या.
आता प्रत्येक भेंडीला दोन भागांमधे मधोमध चिरा. व्यायल्यानंतर दोन तासाच्या आत एक पुर्ण मुळा खाऊ घाला. त्यानंतर आठ तास उलटूनही जार पडली नसेल तर चिरलेली दिड कीलो भेंडी मीठ आणि गुळासोबत पशूला खायला द्या.
आता बारा तास उलटन गेल्यानंतरही जार किंवा वार पडली नसेल तर वारीच्या मुळाशी गाठ बांधून, गाठीपासून तिन इंच खालून वार कापून घ्या. जार योनीमार्गात परत जाईल.
लक्षात ठेवा हाताने वार काढून्याचा प्रयत्न करू नका. चार आठवड्यापर्यंत एक एक मुळा प्रत्येक आठवाड्याला खाऊ घालत रहा.
तर मित्रांनो, ही होती जार अथवा वार अडकल्यावर पारंपरिक पद्धतीने उपचार कसे करावे ह्या विषयी संपूर्ण माहिती. हे माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये जरूर कळवा. आणि माहिती ज्या शेतकऱ्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत ही नक्की पोहोचवा.
Thank you for your sharing. I am worried that I lack creative ideas. It is your article that makes me full of hope. Thank you. But, I have a question, can you help me?
Can you be more specific about the content of your article? After reading it, I still have some doubts. Hope you can help me.
I don’t think the title of your article matches the content lol. Just kidding, mainly because I had some doubts after reading the article.