Bsc agriculture मित्रांनो, कोरोनाच्या काळात भल्याभल्यांची परिस्थिती बदलून गेली. अनेकांची स्वप्ने धुळीला मिळाली आणि आयुष्यात एक वेगळेच वळण आले. अश्याच अनोख्या परिस्थितीला सामोरे जाऊन त्यातून खंबीरपणे वाट काढू पाहणारे शेतकरी म्हणजे अभिजित नंदकुमार चौधरी. मुक्काम पोस्ट कानगावं, तालुका दौंड, जिल्हा पुणे येथे त्यांचा चौधरी डेअरी फार्म आहे. पुण्यात Bsc agriculture करून upsc ची तयारी करणारा हा तरुण lockdown च्या काळात गावी परतला. मोठ्या भावाचा दुग्धव्यवसाय त्याने जवळून पहिला. भावाला जमेल तेवढा हातभार लावला. परंतु थोड्याच दिवसात कारोना मुळे भावाचा देहांत झाला आणि दुग्धव्यवसायाची संपूर्ण जबाबदारी अभिजित वर येऊन पडली.

या फार्म मध्ये मुर्हा, जाफराबादी , मुंडा इत्यादी जातींच्या म्हशी तसेच जरसी गाय असे मिळून साधारण 104 जनावरे आहेत. यांपैकी मूर्हा जातीच्या म्हशी ह्या हरियाणा राज्यातून आणलेल्या आहेत. इतर म्हशींच्या तुलनेत मुर्हा म्हशी जास्त दूध देणाऱ्या व कमी आजारी पडणाऱ्या असतात. हरियाणा मधून आणताना प्रवासामुळे त्यांच्या शरीरात calsium ची कमतरता होवून अशक्तपणा येऊ शकतो. परंतु दहा ते पंधरा दिवसांत त्या महाराष्ट्रातील वातावरण आपलेसे करून घेतात.
चौधरी डेअरी फार्म मध्ये 8-8 महिन्यांपर्यंत दूध देणाऱ्या म्हशी देखील आहेत. कारण इतर म्हशींच्या तुलनेत मुर्हा म्हशींचा दूध देण्याचा कालावधी जास्त असतो. या बरोबरच ह्या फार्म मध्ये धारा काढणे, चारा टाकणे, जनावरांवर देखरेख ठेवणे यासाठी नऊ कामगार आहेत. येथील एकूण जनवरांपैकी 45 ते 50 जनावरे दुधाची आहेत. त्यांचे महिना काठी 500 लिटर दूध संकलन होते.
Bsc agriculture
भावाने कष्ट करून उभा केलेला चौधरी डेअरी फार्म अभिजित सुध्दा डोळ्यात तेल घालून सांभाळत आहेत. भावाने फक्त 15-20 म्हाशिंपासून एवढा मोठा केलेला डेअरी फार्म अजुन मोठा करण्यासाठी ते अपार परिश्रम घेत आहेत. दुग्धव्यवसाय करताना दुधाचे दर कितीही कमी अथवा जास्त झाले तरी शेतकऱ्याला तोटा होत नाही असे त्यांनी आम्हाला मुलाखत देताना सांगितले. दुग्धव्यवसायातून निघणारे शेण, दूध, जनावरांचे मलमुत्र, इत्यादी सर्व उत्पादने उपयुक्त आहेत. त्यामुळे दुग्ध व्यवसाय हा एक समृद्ध व्यवसाय ठरतो.
चला तर मग, आजच्या तरुण पिढीसाठी दुग्ध व्यवसाय कितपत नफ्याचा आहे, दुग्ध व्यवसायासाठी गुंतवणूक किती लागते

Bsc agriculture नोकरी चा पर्याय नाकारून गायी म्हशींचे पालन व दुग्ध व्यवसाय करण्याकडे भर देणारे अनेक शेतकरी देशात तसेच महाराष्ट्रात सुध्दा मोठ्या प्रमाणावर पहायला मिळतात. असेच एक शेतकरी म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील भादुले गाव येथील नारायण मारुती पाटील. नारायण पाटील गेली वीस वर्षे दुग्धव्यवसाय सांभाळत आहेत. त्यांच्या गोठ्यात जास्तीत जास्त वीस लिटर पर्यंत दूध देणारी म्हैस देखील आहे.मुळात मुर्हा म्हशींचे दुध देण्याचे प्रमाण जास्त असते व आजारी पडण्याचे प्रमाण तुलनेने कमी असते. गोठा नियोजन करण्यासाठी व कामगारांवर देखरेख ठेवण्यासाठी सुद्धा नारायण यांना कुटुंबाची भक्कम साथ लाभली आहे.
त्यांची मुले आणि पत्नी यथाशक्ती गोठा सांभाळायला मदत करतात. महिनाकाठी एकुण खर्च वजा करता 4 लाख रुपये उत्पन्न नारायण कमवतात. गायीचे व म्हशीचे मिळून जवळपास 450 ते 500 लिटर दूध उत्पादन होते. अशाप्रकारे दुग्धव्यवसाय एक नफ्याचा व्यवसाय आहे. शहरात जाऊन 10- 20 हजारांच्या नोकरी मागे पळण्या ऐवजी हा व्यवसाय करुन केवळ 7 ते 8 जनावरांमध्ये सुद्धा 50000 रुपये नफा दर महिन्याला मिळवता येवू शकतो असा नारायण यांचा दृढ विश्वास आहे. शिवाय तरूणांनी मोठ्या संख्येने ह्या व्यवसायात आल्यास त्यांचा फायदा आहे असे नारायण यांनी आम्हाला मुलाखत देताना सांगितले. Bsc agriculture