Dairy Farming in Maharashtra Marathi Mahiti शेतीला सर्वाधिक उपयुक्त ठरणारा पूरक उद्योग म्हणजेच दुग्ध व्यवसाय. गायी किंवा म्हशी पाळून हा व्यवसाय केला जातो. १९७० सालपासून महाराष्ट्रात या व्यवसायाला मोठी गती मिळाली. तत्पूर्वी दुग्ध व्यवसाय एवढा संघटितपणे आणि व्यापक प्रमाणावर होत नव्हता. आपल्याकडील प्रचंड लोकसंख्या, गुरांची कमी प्रमाणातील उत्पादनक्षमता तसेच बहुसंख्य उत्पादकांकडे मर्यादित प्रमाणात असलेली जमीन यांमुळे दुधव्यवसायाच्या प्रगतीस मर्यादा होत्या. परंतु त्यानंतर देशात आणि महाराष्ट्रात सुद्धा कित्येक शेतकऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. आणि दुग्धव्यवसायास व्यापक रुप प्राप्त झाले.

असेच एक दुग्धव्यवसायिक म्हणजेच महाराष्ट्रातील दौंड तालुक्यात असलेल्या राहू गावातील सोनवणे फार्म चे मालक – गुलाबराव नरसिंहराव सोनवणे. मागील चार पिढ्यांपासून चालत आलेला म्हैस पालनाचा व्यवसाय ते आज तितक्याच शिताफीने सांभाळत आहेत. मागच्या पिढ्यांनी त्यांच्या परीने सर्वोत्तम रित्या केलेला हा व्यवसाय, यशाच्या अजुन उंच शिखरावर नेऊन ठेवण्याचे काम ते करत आहेत.
Dairy Farming in Maharashtra Marathi Mahiti
केवळ घरगुती उपयोगासाठी म्हणून एक म्हैस विकत घेण्यात आली आणि त्यातून ह्या घराण्याचे म्हैस पालन व्यवसायात पदार्पण झाले. चार पिढ्यांपासून चालत आलेला हा एका म्हशीचा व्यवसाय आज जवळपास चारशे म्हशींच्या फार्म मध्ये रुपांतरीत झालेला दिसतो.
आजपासून साधारण १०० वर्षांपूर्वी पासून ते १९७८ साला पर्यंत सोनवणे घराण्याचा हा व्यवसाय पुण्यात चालू होता. त्यानंतर १९९२ साला पर्यंत वडगाव शेरीतील कल्याणी गावात आणि त्यानंतर दौंड येथील राहू गावात हा व्यवसाय जोमाने चालू राहिला.
सोनवणे फार्म मधील सर्व म्हशी ह्या मुर्हा जातीच्या आहेत. स्थानिक विकल्या जाणाऱ्या म्हशी बरेचदा फॉल्टी निघण्याची शक्यता असते, ज्यामुळे शेतकऱ्याला तोटा होतो. म्हणूनच येथील सर्व म्हशी हरियाणा राज्यातून विकत घेतलेल्या आहेत. हरियाणातील म्हशींना महाराष्ट्रातील वातावरणाची सवय व्हायला पंधरा दिवसांचा कालावधी लागतो. पण त्यानंतर त्या म्हशी कधीच त्रासदायक ठरत नाहीत. फक्त विकत घेताना म्हशीची जात, वय, ठेवण आणि दूध उत्पादन क्षमता तपासून घेणे गरजेचे असते.Dairy Farming in Maharashtra Marathi Mahiti

Dairy Farming in Maharashtra Marathi Mahiti गुलाबराव यांचे सुपुत्र अमोल सोनवणे हे सुद्धा वडिलांच्या पाऊलवर पाऊल टाकत हाच व्यवसाय पुढे चालवत आहेत. ऑस्ट्रेलिया सारख्या देशात दोन वर्षे शिक्षण आणि चार वर्षे नोकरी करून देखील त्यांची पाऊले ह्याच व्यवसायाकडे वळली. त्यांच्यामुळे सोनवणे फार्म मधील म्हैस पालनाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळाली. या फार्म मध्ये हाताने धारा काढण्या ऐवजी शक्य तोवर बकेट मिल्किंग चा वापर करतात. म्हशींच्या शारितील हिट कमी करण्यासाठी म्हशींचा स्वतंत्र स्विमिंग पुल देखील येथे तयार केलेला आहे. ज्यामुळे म्हशींच्या शरीरातील हिट संतुलित राहून दुग्ध उत्पादनावर त्याचा फार परिणाम होत नाही.
या फार्म वर कामासाठी एकूण अठरा कामगार आहेत. ते सर्व म्हशींची संपूर्णपणे निगा राखण्याचे काम करतात. तसेच फार्म मधील प्रत्येक म्हशीच्या दुधाची, तब्येतीची, आहाराची नोंद करून रेकॉर्डस तयार ठेवतात. ज्यामुळे एकेका म्हशीचा आढावा घेणे सोईचे होते. त्याचबरोबर फार्म मधील म्हाशिंसाठी सोनवणे यांनी १२ एकरात सुपर नेपियर चारा पिकाची लागवड केली आहे.
ह्यात १४ टक्के प्रोटीन असल्यामुळे हा चारा जनावरांसाठी गुणकारी आहे. एवढ्या मोठ्या संख्येने जिवंत जनावरांचा व्यवसाय करत असताना वैयक्तिक आयुष्य बाजूला ठेवून दिवसरात्र खपावे लागते. प्रचंड मेहनत, जिद्द आणि अथक परिश्रम यातूनच व्यवसायाचे वटवृक्ष इतके पसरवले जाऊ शकते. कुटुंबाची भक्कम साथ असल्यामुळे डोळ्यात तेल घालून फक्त आणि फक्त व्यवसायाचा विचार करत राहणे गुलाबराव आणि अमोल सोनवणे यांना शक्य झाले आहे असे आम्हाला मुलाखत देताना त्यांनी सांगितले.Dairy Farming in Maharashtra Marathi Mahiti
3bbqo3
Thank you, your article surprised me, there is such an excellent point of view. Thank you for sharing, I learned a lot.
Your point of view caught my eye and was very interesting. Thanks. I have a question for you.
Your point of view caught my eye and was very interesting. Thanks. I have a question for you.
i3832k
Your point of view caught my eye and was very interesting. Thanks. I have a question for you.