What are African Boersमित्रांनो, शेती बागायती असेल, तुमच्या शेतीला चांगला पाणीपुरवठा होत असेल, वातावरण स्थिर असेल आणि पिकलेल्या मालाला चांगला भाव मिळत असेल तर एकट्या शेतीच्या व्यवसायावर तुम्ही स्वतःचा उदरनिर्वाह करु शकता. पण ह्या सर्व गोष्टी एकाच ठिकाणी असणं फार दुर्मिळ असतं. त्यामुळे संपूर्ण शेतीवर अवलंबून न राहता शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून अनेक व्यवसाय करतात. पशूपालन हा त्यातला सर्वात महत्वाचा व्यवसाय. गाय म्हशी ह्यांचं पालन करुन दुध तसेच इतर पंचगव्य उत्पादनांचा व्यवसाय करता येतो. पण भारतात कमी जमीन असलेले अनेक शेतकरी आहेत.

What are African Boers
What are African Boers गाय म्हैस पालन करण्यासाठी लागणारा खर्च करणं त्यांना परवडेलच असं नाही. अश्या शेतकऱ्यांना मग जिला गरीबाची गाय म्हणतात अशी शेळी धावुन येते. शेळी पालन हा कमी जागेत आणि कमी खर्चात करता येण्यासारखा व्यवसाय आहे. पण हा व्यवसाय नव्याने सुरु करतांना अनेक प्रश्न पडू लागतात. सुरुवात कशी करावी? कोणत्या जातीची शेळी जास्त फायद्याची ठरेल? असे अनेक प्रश्न पडत असतात.

ग्रेट महाराष्ट्र चॅंनल नेहमीच तुमच्या अश्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करत असतो.
आज आम्ही घेऊन आलो आहोत शेळी पालनात अत्यंत फायद्याच्या ठरणाऱ्या बोअर जातीच्या शेळी बिषयी संपूर्ण माहीती.
Thanks for sharing. I read many of your blog posts, cool, your blog is very good.