What is Sharad Pawar gram sadak yojana – शरद पवार ग्रामसमृद्धी योजना काय आहे ? 2024

What is Sharad Pawar gram sadak yojana मित्र मैत्रीणींनो, शेतकरी हा अन्नदाता, बळीराजा, लाखोंचा पोशिंदा समजला जातो. अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्या पासून तर स्वतंत्र प्रजासत्ताक भारताच्या संविधानात ही शेतकऱ्याला महत्व आहे. महाराजांनी रयतेला आणि विशेषतः मावळ्यांना स्वराज्यातील शेतकऱ्याशी आणि त्याच्या शेतीशी कसे रहावे ह्याचे काही नियम घालून दिले होते. सोबतच जमिन मोजणी, दुष्काळात शेतसाऱ्याला माफी, अश्या योजना देखील महाराजांनी राबवल्या. सांगायचं तात्पर्य असं की इतकी शतके झाली. तेव्हापासून आत्तापर्यंत प्रत्येक सत्तेने शेतकऱ्याचं महत्व जाणलय. त्यांच्यासाठी विविध योजना आणल्या, त्या राबवल्या. माननीय शरद पवार ह्यांनी ही ८० च्या दशकात फळबागांच्या बाबतीत असेच क्रान्तिकारी निर्णय घेऊन महाराष्ट्र फलोत्पादनात अग्रेसर बनवला.

What is Sharad Pawar gram sadak yojana

आताच्या महाराष्ट्र सरकारने देखील शरद पवारांच्या ८० व्या वाढदिवसाचे निमित्त साधून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी “शरद पवार ग्राम समृद्धी योजना” जाहीर केली. नेमकी काय आहे ही योजना? ह्याबद्दल आहे आजचा हा व्हिडीओ,
चला तर मग पाहुयात की, ” शरद पवार ग्राम समृद्धी योजना” काय आहे आणि ह्याने शेतकरी आणि त्याच्या गावाला कसा लाभ होणार आहे. What is Sharad Pawar gram sadak yojan

गावातलं अर्थकारण हे शेतीवर अवलंबून असतं. त्यात जोडीला, गाय म्हशींच्या दुधाचा व्यवसाय, शेळीपालन, कुक्कुटपालन असे अनेक घटक ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देत असतात. ह्याच घटकांना सरकारी मदत देउन ते समृद्ध करणं, आणि त्या निमित्ताने गाव समृद्ध करणं हा उद्देश आहे शरद पवार ग्राम समृद्धी योजनेचा.

What is Sharad Pawar gram sadak yojana

“मी समृद्ध तर गाव समृद्ध आणि गाव समृद्ध तर महाराष्ट्र समृद्ध” हा उद्देश समोर ठेवून चार वैयक्तिक लाभाच्या योजना राबवायचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. ह्या योजना पुढील प्रमाणे आहेत.

गाय व म्हैस पालना करता पक्का गोठा बांधणे: बऱ्याचदा जनावरांच्या गोठ्याची जागा लहान आणि अस्वच्छ असते. शेण आणि मलमुत्राची नियोजीत साठवण अश्या जागेत करता येत नाही. त्यामुळे घाण होते आणि परीणामी गाई आणि म्हशीच्या कासे ला विविध आजार होऊ लागतात. अश्या ठिकाणी चारा आणि खुराक साठी गव्हाण आणि मुत्रसंचय टाकी बांधण्यासाठी सरकार तुमची मदत करेल. स्वतःची जमीन आणि त्यासाठी आवश्यक असलेले इतर आवश्यक कागदपत्रे असलेले शेतकरी यासाठी पात्र ठरतील. अश्या एका गोठ्याच्या बांधणीसाठी अंदाजे ७७१८८ रुपये खर्च यतो. पुर्वी ह्या साठी कमीत कमी ६ गुरे असावीत अशी अट होती ती आता २ ते ६ गुरे अशी करण्यात आली आहे. तर त्यापुढे १२ गुऱ्हांसाठी दुप्पट, आणि १८ गुऱ्हांच्या वर असेल तर तिप्पट अनुदान मिळणार आहे.

What is Sharad Pawar gram sadak yojana

शेळी वा मेंढी पालनासाठी शेड उभारणी: शेळी ही गरीबाची गाय समजली जाते. तुम्हाला ठाऊकच आहे की भुमीहीन गरीबासाठी, किंवा लहान जमीन असणाऱ्यांसाठी शेळी हा अत्यंत गरजेचा प्राणी आहे. त्याची योग्य देखभाल केली तर त्या प्राण्यापासून नफा मिळवता येतो. त्यासाठी त्यांचे आरोग्य जपायला हवे आहे. आणि आरोग्य जपण्यासाठी त्यांच्या राहणी करीता शेड उभारायला हवं. तरच त्यांची उन व थंडी पासुन रक्षा करता येईल. तसेच शेळी च्या मल मुत्राचा उत्तम सेंद्रिय खत म्हणून वापर वाढला आहे. त्यासाठी हा प्राणी गरीबासाठी संपत्तीच असतो. पुर्वी शेडसाठी अनुदान मिळवण्यासाठी किमान दहा १० शेळ्या असणं गरजेचं होतं. पण भूमिहीन माणसाला स्वतः च्या पैश्यातून १० शेळ्य घेणे देखील अवघड असतं. ही बाब लक्षात घेता किमान २ शेळ्या असलेल्या भूमीहिन मजुरांना व शेतकऱ्यांना या योजनेला लाभ देता येऊ शकेल. एका शेडसाठी ४९ हजार २८४ रुपये खर्च येतो. हे शेड सिमेंट व विटा व लोखंडी तुळ्यांच्या आधाराने बांधण्यात येईल. एका कुटुंबास जास्तीत जास्त ३० शेळ्यांकरिता ३ पट अनुदान मंजुर करण्यात येईल.

What is Sharad Pawar gram sadak yojana

कुक्कुटपालनासाठी शेड ची उभारणी: ग्रामीण अर्थव्यवस्थेतला आणि ग्रामीण आरोग्याचा देखील एक महत्वाचा घटक म्हणजे कुक्कुटपालन. चिकन मांस खाल्याने शरीराला आवश्यक प्रथिनांचा पुरवठा होतो. आणि ह्या मांसाच्या विक्रीने घराच्या अर्थव्यवस्थेला हातभार लागतो. ह्या दोन्ही गोष्टी लक्षात घेऊन सरकारने कुक्कुटपालन व्यवसाय करणाऱ्यांना सरकारी मदत देवून समृद्ध करण्याचं ठरवलं आहे.
कुक्कुटांचे आरोग्य चांगले रहाण्यासाठी त्यांची राहणीमान चांगले असावे लागते. खराब किंवा त्यांना न मानवणाऱ्या वातावरणापासून त्यांचा बचाव होईल अशी त्यांची व्यवस्था करावी लागते. चांगल्या निवाऱ्यामुळे रात्रीच्यावेळी त्यांचे, पिल्लांचे आणि अंड्यांचे प्राण्यांपासून संरक्षण होते. प्रत्येक शेडला ४९ हजार ७६० रुपये खर्च अपेक्षित आहे. १०० पक्षी यशस्वीरित्या सांभाळणाऱ्या लाभार्थींनी पक्षांची संख्या १५०च्या वर नेल्यास मोठ्या शेडसाठी दुप्पट निधी उपलब्ध करून देण्यात येईल.What is Sharad Pawar gram sadak yojana

What is Sharad Pawar gram sadak yojana
What is Sharad Pawar gram sadak yojana

भुसंजीवणी नाडेप कंपोस्टिंग : शेती कसतांना, तसेच पिकांच्या काढणीनंतर बराच कचरा शेतात जमा होतो किंवा त्यातून बराच कचरा निर्माण होतो. असा कचरा बरेच शेतकरी जाळून टाकतात. ह्याने वातावरणात प्रदूषण तर वाढतेच पण त्याच सोबत आपण सेंद्रिय खत निर्मितीतल्या एका चांगल्या घटकाचे नुकसान करत असतो. शेतातील कचऱ्यावर कंपोस्टिंगद्धारे प्रक्रिया केल्यास जमिनीच्या आरोग्यात सुधारणा होऊन कृषी उत्पादनात भर पडते. सेंद्रिय पदार्थात सूक्ष्म जीवांची संख्या मोठ्या प्रमाणावर असते. त्याचा फायदा जमिनीला होतो. याकरिता शेतात एक नाडेप बांधण्यासाठी ही योजना आहे. या नाडेपमध्ये सेंद्रिय पदार्थ, कचरा, शेणमाती आणि मातीचे एकावर एक थर रचले जातात. २ ते ३ महिन्यात काळपट तपकीरी भूसभुशीत, मऊ, दुर्गंधी विरहित कंपोस्ट तयार होते. या नाडेपच्या बांधकामासाठी १० हजार ५३७ रुपये खर्च अपेक्षित आहे. तो निधी उपलब्ध केला जाईल.

तर अश्या प्रकारे गाई म्हशी पालन, शेळी पालन, कुक्कुटपालन आणि नाडेप कंपोस्टिंग ह्या चार घटकांना व्यक्तिगत आधार देवून ते समृद्ध करुन गाव समृद्ध करण्याचा आणि त्या निमित्ताने महाराष्ट्राचे ग्रामीण जीवन समृद्ध करण्याचा शरद पवार ग्राम समृद्धी योजनेचा उद्देश आहे.

10 thoughts on “What is Sharad Pawar gram sadak yojana – शरद पवार ग्रामसमृद्धी योजना काय आहे ? 2024”

  1. пользоваться зеркало может потребоваться тем клиентам букмекерской конторы leon, которые можно
    найти на просторам страны,
    леон зеркало.

    Feel free to surf to my homepage … leon-zerkalou.buzz

Leave a Comment